
'बिग बॉस मराठी सीजन 5'चा फिनाले नुकताच झाला असून सूरज चव्हाण हा या सीजनचा विजेता ठरलाय. लोकांनी प्रचंड असे प्रेम सूरज चव्हाण याला दिले.

सूरज बिग बॉसच्या घरातील अत्यंत प्रामाणिक स्पर्धक होता. हेच नाही तर तुटलेली चप्पल आणि दोन जोडी कपड्यांसह तो बिग बॉसच्या घरात दाखल झाला होता.

आता बिग बॉस मराठी सीजन 5 जिंकल्यानंतर सूरज चव्हाण हा पहिल्यांदा त्याचे बारामतीमधील मोढवे या गावी पोहोचला. यावेळी गावकऱ्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

गावकऱ्यांच्या वतीने सूरज चव्हाण याचे फटाके आणि गुलाल उधळून जोरदार स्वागत करण्यात आले. सुरज चव्हाण याच्या मूळगावी बिग बॉस विजेता झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलीय.

तब्बल 200 किलोचा हार आणि फुलांची उधळण करीत डीजे लावून सुरजची मिरवणूक देखील काढण्यात आली. गावकऱ्यांनी जोरदार पद्धतीने सूरजचे स्वागत केले.