
सध्या सेकंड हँड फोनची विक्री गेल्या काही दिवसात वाढली आहे. विशेषत: Quicker, OLX सारख्या ऑनलाइन सेवा उपलब्ध झाल्यानंतर त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

आपण सेकंड हँड फोनवर किती विश्वास ठेवायचा याबद्दल आपल्या सर्वांना शंका असते. त्यामुळे सेकंड हँड फोन घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत असे टेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मग काय आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊयात.

फोन विकत घेण्यापूर्वी ब्लॅक लिस्टमध्ये आहे का ते तपासा. ब्लॅकलिस्टेड फोन वापरणे कायदेशीर गुन्हा आहे. यासाठी तुम्ही imei.info वेबसाइटवर फोनचा IMEI नंबर टाकून चेक करू शकता.

दुसरं म्हणजे फोनचं हार्डवेअर तपासा. यासाठी तुम्हाला प्लेस्टोअरवरून फोन डॉक्टर प्लस हे अॅप डाउनलोड करावे लागेल. याद्वारे तुम्ही फोनमध्ये काही हार्डवेअर समस्या आहेत का हे जाणून घेऊ शकता.

सेकंड हँड फोन खरेदी करण्यापूर्वी आणखी एक गोष्ट तपासा ती म्हणजे बॅटरी लाईफ. डॉक्टर प्लस अॅपमध्येही बॅटरी टेस्ट करता येते. बॅटरी चाचणीद्वारे तुम्ही बॅटरीचे आयुष्य कसे आहे हे जाणून घेऊ शकता.