४ मिनिटे २६ सेकंदांचे रोमँटिक गाणे… ३२ वर्षांनंतरही ऐकताच काळजाचा ठोका चुकतो; युट्यूबवर होतय ट्रेंड

अनेजण आपला मूड ठिक करण्यासाठी तसेच ताजेतवाने वाटण्यासाठी कानाता हेडफोन घालून गाणी ऐकत असतात. एक असेच गाणे आहे जे 32 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले होते. हे गाणे आजही यूट्यूबवर ट्रेंड होताना दिसत आहे.

| Updated on: Jun 07, 2026 | 10:07 AM
1 / 6
बॉलिवूडमध्ये अशी काही गाणी आहेत जे कित्येक वर्षांनी ऐकल्यानंतरही मन प्रसन्न होते. आज आम्ही तुम्हाला आशाच एका गाण्याविषयी सांगणार आहोत जे 32 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले होते. हे गाणे आजही लोक ऐकताना त्यांच्या काळजाचा ठोका चुकतो.

बॉलिवूडमध्ये अशी काही गाणी आहेत जे कित्येक वर्षांनी ऐकल्यानंतरही मन प्रसन्न होते. आज आम्ही तुम्हाला आशाच एका गाण्याविषयी सांगणार आहोत जे 32 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले होते. हे गाणे आजही लोक ऐकताना त्यांच्या काळजाचा ठोका चुकतो.

2 / 6

आम्ही ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत, ते वर्ष १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या '१९४२: अ लव्ह स्टोरी' (1942: A Love Story) या चित्रपटातील 'एक लडकी को देखा तो' (Ek Ladki Ko Dekha To Aisa Laga) हे गाणे आहे. हे गाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाते.

3 / 6

या गाण्याला कुमार सानू यांनी आवाज दिला आहे. या गाण्याचे हृदयस्पर्शी शब्द आणि अप्रतिम चालीमुळे ते अनेक दशकांपासून प्रसिद्ध आहे. रिलीज होताच हे गाणे लोकप्रिय झाले आणि आजही ते तितकेच प्रसिद्ध आहे. या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा, जैसे...' असे या गाण्याचे बोल आहेत. यामध्ये प्रेयसीची तुलना अनेक सुंदर आणि मनमोहक गोष्टींशी करण्यात आली आहे.

4 / 6

श्रोत्यांनी या गाण्याला खूप पसंती दिली. आजही हे गाणे कुठे ऐकू आले, किंवा जेव्हा 'लव्ह अॅट फर्स्ट साईट' (पहिल्या नजरेतील प्रेम) ची चर्चा होते, तेव्हा या गाण्याची हमखास आठवण येते. ९० च्या दशकातील सर्वाधिक रोमँटिक गाण्यांमध्ये या गाण्याचा समावेश होतो. तसेच, हे आर. डी. बर्मन (RD Burman) यांच्या शेवटच्या काळातील सर्वात गाजलेल्या गाण्यांच्या यादीतही समाविष्ट आहे.

5 / 6

या चित्रपटातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे सर्वात मोठे हिट ठरले होते, ज्याला YouTube वर १५० मिलियनहून (१५ कोटी) अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आजही हे गाणे रोमँटिक प्लेलिस्टमध्ये सर्वात वर असते. पहिल्यांदा ऐकल्यावर हे गाणे जेवढे सुंदर वाटले होते, तेवढीच त्याची जादू अनेक वर्षांनंतरही कायम आहे. लोकांनी याला केवळ संगीतापुरते मर्यादित न ठेवता आपल्या भावना आणि आठवणींचा एक भाग बनवले आहे.

6 / 6

हे गाणे '१९४२: अ लव्ह स्टोरी' या चित्रपटातील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांनी केले होते. यामध्ये अनिल कपूर, मनीषा कोइराला, जॅकी श्रॉफ आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. स्वातंत्र्य चळवळीच्या कथेवर आधारित या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचे बजेट सुमारे ४.५ कोटी रुपये होते. तर, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ११.५० कोटींचा व्यवसाय केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us