पाण्याच्या बॉटलची झाकणे वेगवेगळ्या रंगाची का असतात? 99 टक्के तुम्हाला माहिती नसेल कारण

भारतात बाटलीबंद पाणी पिण्याची सवय वाढली आहे. पण तुम्ही कधी पाण्याच्या बाटलीच्या झाकणाच्या रंगाकडे लक्ष दिले आहे का? या रंगांचा अर्थ जाणून घ्या आणि जाणकार ग्राहक व्हा.

| Updated on: Jul 11, 2025 | 4:50 PM
1 / 8
हल्ली आपण कुठेही गेलो तरी आणि तहान लागली तर सहज बाटलीबंद पाणी विकत घेतो आणि ते पितो. 1970 च्या दशकात भारतात बाटलीबंद पाण्याची सुरुवात झाली. आज देशातील एक चतुर्थांश लोकसंख्या या बाटलीबंद पाण्यावर अवलंबून आहे.

2 / 8
बिस्लेरीसारख्या कंपन्यांनी या क्षेत्रात विश्वासार्हता मिळवून 'शुद्ध पाणी' म्हणजे 'बिस्लेरी' असे समीकरणच लोकांच्या मनात रुजवले आहे. गेल्या काही दशकांत अनेक कंपन्यांनी पाण्याच्या पॅकेजिंग आणि ब्रँडिंगमध्ये क्रांती घडवून आणली आहे.

3 / 8
आपणही अनेकदा पाण्याची बॉटल खरेदी करतो, पण कधी तिच्या झाकणाच्या रंगाकडे बारकाईने लक्ष दिले आहे का? नाही ना. जर तुम्ही कधी बारकाईने पाहिले असेल, तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांच्या झाकणांचे रंग वेगवेगळे असतात.

4 / 8
हा फक्त एक डिझाइनचा भाग नाही, तर या प्रत्येक रंगामागे एक विशिष्ट अर्थ दडलेला आहे. बाजारात पाण्याच्या अनेक कंपन्या आहेत आणि जेवढे ब्रँड, तेवढे त्यांचे प्रकारही आहेत. प्रत्येक रंगाच्या झाकणाचा आपला एक वेगळा अर्थ असतो. या रंगांमागील रहस्य काय हे आपण जाणून घेणार आहोत.

5 / 8
जर पाण्याच्या बॉटलला पांढऱ्या रंगाचं झाकण असेल, तर याचा अर्थ हे पाणी प्रोसेसस्ड म्हणजे प्रक्रिया केलेले आहे. हे पाणी फिल्टर करून शुद्धीकरण प्रक्रियांद्वारे पिण्यायोग्य बनवलेले असते.

6 / 8
जर तुमच्या पाण्याच्या बॉटलला काळ्या रंगाचं झाकण असेल तर ते पाणी अल्काईन असते. हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे पाणी विशिष्ट pH पातळी राखण्यासाठी प्रक्रिया केलेले असते.

7 / 8
जर निळ्या रंगाचं झाकण असेल अर्थ असा होतो की, हे पाणी धबधब्यातून घेतलेले आहे. नैसर्गिकरित्या शुद्ध आणि खनिजांनी परिपूर्ण असलेले हे पाणी थेट नैसर्गिक स्रोतातून येते.

8 / 8
जर हिरव्या रंगाचं झाकण असेल तर या पाण्यात फ्लेवर मिक्स केलेले असते. हे सहसा फळांच्या किंवा इतर नैसर्गिक स्वादांचे मिश्रण असलेले पाणी असते, जे तहान भागवण्यासोबतच चवीचा अनुभवही देते. त्यामुळे जेव्हा तुम्ही पाण्याची बॉटल खरेदी कराल, तेव्हा तिच्या झाकणाचा रंग नक्की तपासा.