
कोल्ड ड्रींक (Soda) - कोल्ड ड्रिंक खासकरुन सॉफ्ट ड्रिंक लहानापासून मोठ्यांना सर्वांना आवडते. मात्र त्याने कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. या ड्रिंक्समध्ये फॉस्फोरिक एसिड असते. ते शरीरात कॅल्शियमचे शोषण रोखते.त्यामुळे हाडे हळूहळू कमजोर होतात. त्यामुळे कोल्ड ड्रींक पिणे कमी करावे.

रेड आणि प्रोसेस्ड मीट - रेड मीट ( बकरीचे मटण ) आणि प्रोसेस्ड मीट (उदा. सॉसेज, बेकन, हॉट डॉग्स) सेवनाने युरिक एसिडचे समस्या होऊ शकते. ज्याचा हाडांवर मोठा प्रतिकूल प्रभाव होतो. हा पदार्थ शरीराच्या आतील कॅल्शियमचे शोषण प्रभावित करतो. त्यामुळे हाडांचे आरोग्य ढासळते.

केक, कँडी आणि कुकीज - केक, कॅडी आणि कुकीज सारखे गोड आणि प्रोसेस्ड खाद्य पदार्थांत अत्यंतिक साखर रिफाईंड कार्बोहायड्रेट्स असतात आणि ते कॅल्शियमच्या शोषणात अडथळे आणतात. या पदार्थाने शरीरात सूज येऊ शकते. हाडे कमजोर होऊ शकतात. या अतिशय गोड पदार्थांपासून दूर रहा.

चहा (Tea)- चहा कॅफीन असते जे शरीरात कॅल्शियमचे शोषण कमी करते. जर तुम्ही अधिक चहा पित असाल तर तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी ते खतरनाक साबित होऊ शकते. चहा किंवा कॉफीचे अधिक सेवन हाडातून कॅल्शियम कमी करु शकते. त्यामुळे हाडे कमजोर होतात. त्यामुळे चहा - कॉफी कमी करुन पाणी किंवा कॅल्शियमच्या अन्य पेयांचे सेवन करा.

मद्य (Alcohol) - मद्य प्यायल्याने हाडांवर मोठा वाईट परिणाम होता. दारु शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी करते. आणि त्यामुळे तुमची हाडे कमजोर होऊ शकतात. यामुळे हाडे ठीसुळ होऊ शकतात. हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण वाढते. हाडे मजबूत हवी तर दारु बंद करायला हवी.

ऑईली फूड्स (Oily Foods) - समोसा, फ्राईड चिकन, भजी सारखे तेलकट पदार्थात चरबी अधिक असते. चरबी आणि असंतुलित फॅट्समुळे शरीरात सूज येऊ शकते. त्यामुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण कमी होते. हाडे कमजोर होतात. या पदार्थांचे सेवन अत्यंत कमी करावे. हलका आहार घ्यावा आणि आपले आरोग्य चांगले राखावे.