Dhurandhar : एकेकाळी शिक्षक होता ‘धुरंधर’चा हा अभिनेता, विद्यार्थिनीवरच जडलं प्रेम, कसं झालं लग्न ?

"धुरंधर" मध्ये अतिशय महत्वाची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याची कथा चित्रपटापेक्षा कमी नाही. विख्यात अभिनेता बनण्याआधी तो एक शिक्ष होता, प क्र्सनॅलिटी डेव्हलपमेंट घेऊन ते विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने वावरायला शिकवायचा. आणि त्याच क्लासमुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तिथेच त्याची अशा व्यक्तीशी भेट झाली ज्यामुळे...

| Updated on: Dec 11, 2025 | 12:51 PM
1 / 7
बॉलिवूडमध्ये असे काही स्टार आहेत ज्यांच्या प्रेमकथा खरोखरच एखाद्या कथेपेक्षा कमी नाहीत, त्यातून प्रेरणा घेण्यासारखं आहे. असाच एक स्टार म्हणजे मॅडी अर्थात आर. माधवन.. "धुरंधर" मधील त्याच्या भूमिकेमुळे सध्या तो प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने आयबी चीफ अजय सन्याल ही भूमिका साकरली आहे. मधाळ डोळे, खिळवून ठेवणारं मोहक हास्य, आणि सुरेख रुपाची देणगी मिळालेल्या आर. माधवनचे चित्रपट , तयाचं करिअर नेहमीच चर्चेत राहिलं पण तो कधी विवादांमध्ये अडकलेला दिसला नाही. आजही अनेक तरूणींचा हार्ट थ्रॉब असलेला हा अभिनेता, एकेकाळी शिक्षक होता, हे तुम्हाला माहीत आहे का  ? एवढंच नव्हे तर शिकवता शिकवता , त्याचं त्याच्याच विद्यार्थिनीवर प्रेम जडलं आणि त्यांनी लग्नही केलं. ही लव्हस्टोरी तुम्हाला माहीत आहे का ? ( Photos : Instagram)

2 / 7
अभिनेता बनून लाखो तरूणीच्या हृदयावर राज्य करण्यापूर्वी आर. माधवन हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिक्षक होता. तो विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्यास मदत करायचा. पण त्यांच्या आयुष्यात एक विद्यार्थिनी आली आणि नंतर तीच त्यांची पत्नी बनली. हो, आर. माधवनची पत्नी, सरिता बिर्जे माधवन ही एकेकाळी त्याची विद्यार्थिनी होती.

3 / 7
एव्हिएशन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या सरिता बिर्जे यांनी 1991 साली माधवनच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासमध्ये प्रवेश घेतला. सरिताला पहिला जॉब मिळाल्यानंतर आभार मानण्यासाठी तिने माधवनला डिनरसाठी आमंत्रित केलं आणि तिथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. जवळपास 8 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 1999 साली त्यांनी लग्न केलं.

4 / 7
माधवनला अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळण्याआधीपासूनच सरिता त्याला ओळखते. त्यामुळे ते आजही एकमेकांच्या निकट आहेत, प्रेमात आहेत. आर माधवन आता दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत राज्य करत आहे, त्याचे लाखो चाहतेआहेत, परंतु माधवनच्या आयुष्यात सरिताचं स्थान जराही बदललेलं नाही.

5 / 7
1997 साली आर माधवनने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तो पहिल्यांदा 'इन्फर्नो' (1997) या इंग्रजी चित्रपटात दिसला आणि भारतीय चित्रपटांमधील त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा पहिला भारतीय चित्रपट कन्नड भाषेत होता, ज्याचे नाव 'शांती शांती शांती' होते. पण मणि रत्नम यांच्या 'अलाई पयुथे' हा त्याच्यासाठी मोठा ब्रेक ठरला, त्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली, सर्वांना त्याचं काम प्रचंड आवडलं.

6 / 7
या चित्रपटानंतर, आर माधवनची चित्रपटसृष्टीत मागणी वाढली, लाखो चाहते झाले. पण सर्वात प्रशंसनीय गोष्ट म्हणजे त्याच्या स्टारडमचा सरितासोबतच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही. माधवन अनेकदा त्याच्या प्रेयसीला त्याच्या चित्रपटांच्या सेटवर घेऊन जायचा. त्यांच्या लग्नाला 26 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण आजही त्यांचे नाते मजबूत आहे.

7 / 7
विश्वास, पर्सनल स्पेस आणि ह्यूमर (विनोद) हे आमच्या नात्याचे दीर्घायुष्यासाठी महत्वाचे आहे, असे माधवन सांगतो. त्याचे सर्व आर्थिक व्यवहार त्याची पत्नी पाहते. त्यांना वेदांत नावाचा मुलगा असून तो राष्ट्रीय स्तरावरचा ॲथलीट आहे.