चेहऱ्यावरून नकोसे केस हटवायचे आहेत ? या पदार्थांची घ्या मदत, मिळेल स्मूथ आणि क्लीन त्वचा

Facial Hair Removal Tips : काही लोकांच्या चेहऱ्यावर अतिरिक्त केस असतात, जे चांगले दिसत नाहीत. त्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यातही बाधा येते. हे केस हटवण्यासाठी विविध हेअर रिमूव्हल प्रॉडक्ट्स वापरली जातात, मात्र त्याचा उपयोग होतोच अस नाही. घरात सहज उपलब्ध असणारे काही पदार्थ वापरून अतिरिक्त केस हटवता येतात. ते कोणते ते जाणून घेऊया.

| Updated on: Jul 24, 2023 | 3:02 PM
1 / 5
चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी तुम्ही पपईचा वापर करू शकता. यासाठी पिकलेली पपई मॅश करून त्यात थोडासा मध किंवा दूध मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर अतिरिक्त केस असलेल्या भागावर लावा आणि वाळल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. नियमित वापराने फरक दिसून येईल.

2 / 5
चेहऱ्यावरील अतिरिक्त केसांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही साखर आणि लिंबू यांचे मिश्रण देखील वापरू शकता. त्यासाठी एका वाटीत थोडी साखर घ्या आणि त्यात लिंबाचा रस व थोडं पाणी मिसळा. हे नीट एकत्र करून चेहऱ्यावर लावून पाच ते सात मिनिटे स्क्रब करा. वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. याने अतिरिक्त केस निघण्यास मदत होईल.

3 / 5
चेहऱ्यावर जिथे अतिरिक्त किंवा नको असलेले केस असतील ते काढण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता. यासाठी तांदळाच्या पिठात थोडे गुलाबजल मिसळून त्याची स्मूथ पेस्ट बनवा. यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटे स्क्रब करा. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवून टाका.

4 / 5
नकोसे केस हटवण्यासाठी बेसन आणि दही हा देखील उत्तम मार्ग ठरतो. त्यासाठी एका वाटीत थोडं बेसन घेऊन त्यात दही घाला व मिश्रण एकजीव करा. नंतर त्यात चिमुटभर हळदही घाला. तार केलेली ही पेस्ट चेहऱ्यावर जिथे अतिरिक्त केस आहेत, तिथे लावून थोडा वेळ वाळू द्या. पेस्ट अर्धी वाळल्यानंतर ती स्क्रब करून चेहऱ्यावरून काढा आणि साध्या पाण्याने चेहरा धुवा.

5 / 5
 तुम्ही दूध आणि हळदीच्या सहाय्यानेही चेहऱ्यावरील केस काढू शकता. यासाठी दोन-तीन चमचे दुधात दोन चिमूट हळद मिसळून चेहऱ्याला लावा. ही पेस्ट पंधरा मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या, नंतर साध्या पाण्याने धुवा. नियमित वापराने तुम्हाला फरक दिसून येईल.