
टर्की या देशातील पामुक्काले गावात जगातील सर्वांत अनोखा गरम पाण्याचा झरा आहे. युनोस्कोच्या जागतिक वारसास्थळात या गरम पाण्याच्या झऱ्याचा समावेश आहे. (Image Source: Getty Images)

या गरम पाण्याच्या झऱ्याच्या परिसरातील चुनखडकाचे दगड आहेत. कापसाने तयार केलेल्या एखाद्या महलाप्रमाणे ते भासतात. याच कारणामुळे पामुक्काले या भागाला कॉटन कॅसल असे म्हटले जाते. (Image Source: Getty Images)

पामुक म्हणजेच कापूस या शब्दापासून पामुक्काले या गावाचे नाव पडलेले आहे. क्क्ले या शब्दाचा अर्थ महल असा होतो. (Image Source: Getty Images)

गरम पाण्याच्या या झऱ्यात कॅल्शिमय कार्बोनेट मोठ्या प्रमाणात मिळते. त्वचेच्या अनेक आजारांसाठी हा घटक फार लाभदायी आहे, असे मानले जाते. (Image Source: Getty Images)

पामुक्काले या गावात गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये चनुखडक आहे. या चुनखडकांच्या दगडांत पाण्याचे झरे पाहायला मिळतात हा परिसरा एखाद्या स्वर्गाप्रमाणे भासतो. (Image Source: Getty Images)