
अभिनेत्री हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐ रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून हिनाला खास ओळख मिळाली. हिनाचा चाहतावर्गही जबरदस्त आहे.

हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय. ब्रेस्ट कॅन्सरचे निदान लागल्यापासून ती सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. एका वाईट वेळेतून जाताना हिना दिसत आहे.

हिना खान हिच्याकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हिनाने आतापर्यंत पाच किमो घेतले आहेत. मात्र, पाच किमोनंतर तिला प्रचंड त्रास होतोय.

व्हिडीओमध्ये मी ठीक असल्याचे सांगताना हिना दिसत आहे. तीन किमो अजूनही बाकी असल्याचे सांगताना हिना खान ही दिसली आहे.

पुढील काही दिवसांमध्ये सर्वकाही ठीक होईल, असे तिने म्हटले. मी लवकरच पूर्णपणे ठिक होईल असेही हिना खान हिने म्हटले आहे. देवावर माझा विश्वास आहे, असेही हिना खान हिने म्हटले.