
संजय गायकवाड, संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधत विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर अनोखं आंदोलन करण्यात आलं. सचिन अहिर, शशिंकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवे यांनी टॉवेल आणि बनियानवर हे आंदोलन केलं.

महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियन गँगचा धिक्कार असो, अशा आशयाचे फलक त्यांनी हातात धरले होते. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर त्यांनी जोरदार घोषणाबाजीदेखील केली.

'महाराष्ट्राची सुरूय लूट, चड्डी बनियन गँगला सूट', 'खोक्यांची वाढलीय मस्ती, चड्डी बनियन गँगची पहा कुस्ती' असेही फलक विरोधकांच्या हातात होते. यावेळी शिंदेंच्या मंत्र्यांना विरोधकांकडून टारगेट करण्यात आलं.

संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. संजय गायकवाडांनी आकाशवाणी आमदार निवासातील कँटीन चालकाला मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी संजय गायकवाड टॉवेल आणि बनियानवर होते.

पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू असताना गिरीश महाजन तिथून जात होते. त्यांचं आंदोलन पाहून महाजनांना हसू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी विरोधकांनी त्यांच्याशी हस्तांदोलनही केलं.