तुमच्या घरात वास्तुदोष आहे का? फक्त पाच लक्षणांवरुन लगेचच ओळखा

तुमच्या घरात शांती, आरोग्य व समृद्धीचा अभाव जाणवतोय का? वास्तुदोष हे याचे मुख्य कारण असू शकते. योग्य वास्तूदिशा नसेल तर कुटुंबाच्या जीवनावर परिणाम होतो. वास्तुदोष ओळखून उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

| Updated on: Oct 09, 2025 | 4:38 PM
1 / 8
प्रत्येकाला आपल्या घरात शांती, आनंद आणि समृद्धी हवी असते. पण अनेकदा विनाकारण ताण, आजार किंवा आर्थिक अडचणी येऊ लागतात. अशा वेळी लोक अनेक उपाय करतात, मात्र अनेकदा घरातील वास्तू आणि तिच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात.

2 / 8
तुमच्या घरात वास्तूशी संबंधित काही दोष म्हणजे वास्तुदोष असल्यास त्याचा थेट परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर होतो. वास्तुशास्त्र तुमच्या घराची ऊर्जा संतुलित ठेवते.

3 / 8
जर घरात विनाकारण वारंवार भांडणे होत असतील किंवा नात्यात तणाव वाढत असेल, तर हे वास्तुदोषाचे स्पष्ट लक्षण असू शकते. तुमच्या लिव्हिंग रुमची दिशा किंवा बेडरुमची दिशा चुकीच असल्यावर त्याचा थेट परिणाम नात्यावर होतो.

4 / 8
जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणी वारंवार येत असतील तर तिजोरी आणि स्वयंपाकघराच्या दिशेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. व्यवसायात तोटा, कठोर परिश्रम करूनही आर्थिक लाभ न होणे आणि खर्चात सतत वाढ होणे ही तिजोरीची किंवा घराच्या चुकीच्या दिशेमुळे होणाऱ्या वास्तुदोषाची लक्षणे आहेत.

5 / 8
स्वयंपाकघराची चुकीची दिशा देखील थेट आर्थिक परिस्थितीवर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते. स्वयंपाकघर आग्नेय (South-East) दिशेला असणे शुभ मानले जाते.

6 / 8
जर घरात एक किंवा अधिक लोकांना झोपेची समस्या, डोकेदुखी, थकवा किंवा वारंवार पोटाच्या समस्या यासारख्या आरोग्य समस्या होत असतील तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण आहे. तुमच्या घरावर नकारात्मक उर्जेचा प्रभाव आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

7 / 8
 घरातील वस्तू वारंवार खराब होणे हे देखील वास्तुदोषाचे संकेत असू शकतात. टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन किंवा नळ यांसारख्या घरगुती वस्तू वारंवार खराब होत असतील किंवा भिंतीमध्ये भेगा पडत असतील, तर हे वास्तुशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. तसेच नळातून पाणी गळत राहणे हे देखील आर्थिक नुकसानीचे लक्षण मानले जाते.

8 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)