
वास्तूशास्त्रानुसार बेडरुमची रचना केल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. बेडरुम ही अशी जागा आहे, जिथे चुकूनही काही वस्तू ठेवू नयेत. या वस्तू बेडरुममध्ये ठेवल्या तर तुम्हाला फटका बसू शकतो.

वास्तूशास्त्रानुसार बेडरुममध्ये चुकूनही चप्पल किंवा बुट ठेवू नये. तसेच बेडरुममध्ये पक्षी किंवा जंगलातील प्राण्यांचे फोटो लावू नयेत.

बेडरुममध्ये काळ्या किंवा गडद रंगाचे बेडशीट वापरू नये. दरवाजाच्या अगदी समोर बेड असणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे दरवाजातून बेड दिसू नये याची काळजी घ्यावी.

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार बेडरुममध्ये कधीही धार्मिक फोटो लावू नयेत. तसेच बेडरुममध्ये तुटलेले फर्नीचर ठेवल्यास दरिद्री घरात येते, असे म्हटले जाते.

बेडरुममध्ये कॅक्टस किंवा कोणतेही काटेरी झाड, रोपटे लावू नये, असे सांगितले जाते. बेडरुममध्ये काटेरी झाड ठेवणे हे अशुभ मानले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.