
अनेकांना रात्री झोपताना तहान लागते. त्यामुळे त्यांना बेडरूममध्ये पाण्याची बॉटल ठेवावी लागते. वारंवार किचनमध्ये जाण्याची वेळ येऊ नये म्हणून बेडरूममध्येच पाण्याची बॉटल ठेवली जाते. पूर्वीच्या काळी लोक खोलीत पाण्याचं भाडं ठेवायचे. पण आता काळ बदलला आहे. पण बेडरूममध्ये घागर, भांड्यांऐवजी बाटली ठेवली पाहिजे का? असं केल्याने काय होतं? वास्तूशास्त्र काय सांगतं?

पाण्याच्या घोटाला सोन्यासारखा भाव

फेंगशुईनुसार, बेडरूममध्ये पाणी घेऊन झोपणे योग्य नाही. त्यामुळे तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. बेडरूममध्ये पाणी ठेवल्यास पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. वास्तुनुसार, बेडरूममध्ये फक्त पाणीच नाही तर पाण्याशी संबंधित चित्रे देखील ठेवू नयेत.

तुम्हाला अधिक पाण्याची गरज वाटत असेल तर पाणी योग्य दिशेला ठेवा. कारण पाणी चुकीच्या दिशेला ठेवल्याने तुमच्या खोलीत नकारात्मकता वाढते. अशावेळी तुम्हाला बेडरूममध्ये पाणी ठेवायचे असेल तर ते नेहमी ईशान्य दिशेला ठेवा. शक्य असल्यास ते काचेच्या स्टूलवर ठेवा.

अनेक घरांमध्ये पिण्याचे पाणी बेडरूममध्ये कुठेतरी ठेवलेले असते. ते बेडसाईड टेबलवर ठेवणे सामान्य आहे. पण हे करणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जर तुम्हाला पाणी साठवणे आवश्यक वाटत असेल तर ते बेडपासून काही अंतरावर ठेवा. तांब्याच्या भांड्यात किंवा बाटलीत पाणी ठेवणे चांगले.

Water