Viral : जितकी जाड बायको तितकं मोठं बक्षीस, या अनोख्या स्पर्धेची जगभरात चर्चा
Wife Carrying Championship : जगात अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते, मात्र एका स्पर्धेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या स्पर्धेत पती आपल्या पत्नीला खांद्यावर उचलून धावतात. या स्पर्धेची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुमची पत्नी जितकी वजनदार असेल, तितके मोठे बक्षीस तुम्हाला मिळते.

अनोखी स्पर्धा : फिनलंडमध्ये एक अनोखी स्पर्धा आयोतिय केला जाते. यात पुरुष आपल्या पत्नीला खांद्यावर किंवा पाठीवर घेऊन धावण्याची शर्यत करतात. विशेष म्हणजे या स्पर्धेत जिंकणाऱ्याला पत्नीच्या वजनाइतके बक्षीस दिले जाते.

नाव काय? : फिनलंडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वाइफ कॅरिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये पती आपल्या पत्नीला उचलून धावतात. मात्र ही फक्त साधी शर्यत नसते, तर यात अनेक कठीण अडथळेही पार करावे लागतात.

अवघड ट्रॅक : ही स्पर्धा अधिक रोमांचक करण्यासाठी ट्रॅक मुद्दाम कठीण बनवला जातो. मार्गात पाण्याचे खड्डे, वाळूचे भाग आणि चढ-उतार असलेले ट्रॅक असतात. या सर्व अडथळ्यांमधून पतीला पत्नीला घेऊन धावत फिनिश लाईन गाठावी लागते. या ट्रॅकची लांबी सुमारे 253 मीटर असते.

बक्षीस काय? : ही स्पर्धा जितकी मजेदार आहे, तितकेच भन्नाट तिचे बक्षीस आहे. विजेत्याला त्याच्या पत्नीच्या वजनाइतकी बिअर बक्षीस म्हणून दिली जाते. म्हणजेच पत्नीचे वजन 80 किलो असेल, तर तुम्हाला तब्बल 80 लिटर बिअर मिळते. त्यामुळे अनेक जण जास्त वजनाच्या पार्टनरसह या स्पर्धेत भाग घेतात.

जगभरातील जोडप्यांचा सहभाग : या स्पर्धेत जगभरातील लोक सहभागी होतात. फिनलंडसह अमेरिका, स्वीडन, एस्टोनिया आणि भारतातील लोकही या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात.