
मानव नेहमीच भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. मग ते स्वत:विषयी असू दे किंवा जगाविषयी. यापूर्वी अनेक भविष्यवक्त्यांनी केलेल्या भविष्यवाण्या आजही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. बाबा वेंगा आणि नोस्ट्रोडेमस यांसारख्या भविष्यवक्त्यांचे बरेच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पण त्यांनी केलेल्या भविष्यवाण्या सध्या चर्चेत आहेत. सध्या जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियो तात्सुकी यांच्या भविष्यवाण्यांची सर्वत्र चर्चा आहे.

एका पुस्तकात रियो तात्सुकी यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. रियो तात्सुकी यांचे चाहते त्यांना फ्रेडी मर्करीचा मृत्यू, ग्रेट हानशिन भूकंप, 2011 चा तोहोकू भूकंप आणि सुनामी तसेच कोरोना महामारीच्या अचूक भविष्यवाण्यांचे श्रेय देतात. यामुळेच तात्सुकी जेव्हा एखाद्या अनपेक्षित घटनेची भविष्यवाणी करतात, तेव्हा लोक त्यांचे गांभीर्याने ऐकतात.

रियो तात्सुकी यांनी 5 जुलाई 2025 रोजी जपानमध्ये भीषण त्सुनामी येईल, अशी भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली नाही. याबाबत त्यांच्या वेबसाइटचे व्यवस्थापक लियो म्हणतात, 'रियो तात्सुकी यांच्या भविष्यवाण्या 15 वर्षांच्या चक्रानुसार होतात. म्हणजेच त्यांनी जी भविष्यवाणी केली आहे, ती 15 वर्षे पुढे सरकेल.'

पण आता बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी प्रमाणे हवाई येथे ज्वालामुखीची उद्रेक झाला आहे.

बुधवारी हवाईच्या बिग आयलंडवरील माउंट किलौआ ज्वालामुखीचा उद्रेक सलग नऊ तास सुरू होता, ज्यामुळे काही वेळा १२०० फूट उंचीपर्यंत लावाचे फवारे बाहेर पडत होते. गेल्या डिसेंबरपासून या ज्वालामुखीचा २८ वेळा उद्रेक झाला आहे.