
आपल्याही घरासमोर एक आलिशान कार असावी, असे प्रत्येकालाच वाटते.

पण पैसे नसल्यामुळे अनेकांना त्यांच्या स्वप्नातली कार घेणे शक्य होत नाही. तुमची आवडती कार घेण्यासाठी अनेक बँका कर्जही देतात.

पण काही बँका हे कर्ज देताना मोठा व्याजदर आकारतात. सरकारी बँक म्हणून ओळख असलेली एसबीआय ही बँकदेखील ग्राहकांना कार घेण्यासाठी कर्ज देते.

एसबीआयकडून कार लोनसाठी सुरुवातीचा व्याजदर हा 9.10 टक्के आहे. तुमच्या सिबिल स्कोअरनुसार हा व्याजदर कमी-अधिक होऊ शकतो.

तुम्हाला सात लाखांची आलिशान कार घ्यायची असेल आणि कर्जफेडीची मुदत 5 वर्षांची ठेवायची असेल तर तुम्हाला 14,565 ईएमआय येईल. एकूण पाच वर्षांत सात लाखांच्या कर्जावर तुम्हाला 8,73,891 रुपये भरावे लागतील. म्हणजेच पाच वर्षांत तुम्ही 1,73,891 रुपये व्याज म्हणून द्याल.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)