Gold Rate : अरे बापरे! 10 ग्रॅम सोन्याचा ताजा भाव काय? चक्क…एका तोळ्याच्या दागिन्याला किती रुपये?
अमेरिका-इस्रायल युद्धामुळे जगावर उर्जासंकट निर्माण झालेले आहे. दुसरीकडे याच युद्धामुळे सोन्याचा भावही कधी कमी तर कधी जास्त होताना दिसतोय. देशांतर्गत घडामोडींमुळेही सोन्याच्या भावात बदल होताना पाहायला मिळत आहे.

सोन्याचा भाव आज (3 मे) 15,093 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 15,093 रुपये प्रति ग्रॅम एवढा झाला आहे. मुंबीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 13,835 रुपये प्रति 1 ग्रॅम एवढा आहे.

मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव 11,320 रुपये प्रति ग्रॅम एवढा आहे. शनिवार आणि रविवारी बाजार बंद असतो. त्यामुळे आता सोमवारी सोन्याचा भाव कमी होणार की वाढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या मुंबईत 8 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 1,20,744 रुपये लागत आहेत. तुम्हाला एक तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोने खरेदी करायचे असतील तर 1,50,930 रुपये मोजावे लागतील. 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याचा भाव 15,09,300 रुपये आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)