
रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेस अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे. जगातल्या श्रीमंतांमध्ये त्यांची गणना होते. त्यांच्याकडे अब्जो रुपयांची प्रॉपर्टी आहे. विशेष म्हणजे त्यांचे राहणीमान, त्यांच्याकडे असलेल्या गाड्या, घर पाहून त्यांच्या श्रीमंतीची कल्पना करता येते.

दरम्यान, त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील भरपूर पगार आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. पेट्रोकेमिकल, रिफायनिंग, तेल आणि नैसर्गिक वायू, टेलिकॉम अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचा उद्योग पसरलेला आहे.

अंबानी हे देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असल्यामुळे त्यांना कडक सुरक्षा प्रदान केली जाते. मुकेश अंबांनी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंबानी यांच्या सुरक्षा रक्षकाला मासिक वेतन 14,536 रुपये ते 55,869 एवढे दिले जाते.

विशेष म्हणजे वेगवेगळ्या सुरक्षा रक्षकांना वेगवेगळे वेतन आहे. यासह अंबानी यांच्याकडे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला इतरही अनेक सुविधा मिळतात. मुकेश अंबानी मुंबईत राहतात. मुंबईत त्यांचे अँटेलिया नावाचे एक आलिशान असे घर आहे. हे घर एकूण 27 मजल्यांचे आहे.

विशेष म्हणजे या घरामध्ये जगातील सर्व सुखसुविधा आहेत. जीम, स्वीमिंग पुलपासून सर्वच इतर सर्वच गोष्टी या घरात आहेत. मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठीत भागात हे आलिशान घर आहे. या घराचीच किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. अंबानी कुटुंबाकडे आलिशान गाड्या आहेत.