
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा लेक आराध्या बच्चन कायम आईसोबत दिसते. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

2007 मध्ये अभिषेक याच्यासोबत लग्न केल्यानंतर ऐश्वर्याने लेक आराध्या हिला जन्म दिला. पण आराध्या या नावाचा अर्थ फार कोणाला माहिती नाही.

ऐश्वर्याची लेक आराध्याचं नाव संस्कृत भाषेतील शब्दातून घेण्यात आलं आहे. आराध्या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याची पूजा केली जाते.

आराध्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या धीरूबाई अंबानी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतप उच्च शिक्षणासाठी आराध्या परदेशात जाणार अशी देखील चर्चा रंगली आहे.

आराध्या हिच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतात. शिवाय सेलिब्रिटी किड्स म्हणून देखील आराध्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.