WhatsApp AI Feature : तुम्ही झोपेत, तरी व्हॉट्सॲपवर रिप्लाय सुरूच! मेसेज टाइप कोण करणार? जाणून घ्या सीक्रेट ट्रिक

तुम्ही गाढ झोपेत आहात किंवा मिटिंगमध्ये प्रचंड व्यस्त आहात... पण तरीही तुमच्या व्हॉट्सॲपवर येणाऱ्या प्रत्येक मेसेजला अगदी तुमच्याच स्टाईलमध्ये अचूक रिप्लाय देणे आता शक्य आहे. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा...

| Updated on: Oct 09, 2026 | 3:41 PM
1 / 5
AI द्वारे ऑटो-रिप्लाय: व्हॉट्सॲपवर आता एआय (Artificial Intelligence) च्या मदतीने मेसेजेसना ऑटो-रिप्लाय देण्याची सुविधा आली असून, यामुळे तुम्ही व्यस्त असताना किंवा झोपेत असतानाही समोरच्या व्यक्तीला तुमच्या भाषेत आपोआप रिप्लाय पाठवला जाईल.

AI द्वारे ऑटो-रिप्लाय: व्हॉट्सॲपवर आता एआय (Artificial Intelligence) च्या मदतीने मेसेजेसना ऑटो-रिप्लाय देण्याची सुविधा आली असून, यामुळे तुम्ही व्यस्त असताना किंवा झोपेत असतानाही समोरच्या व्यक्तीला तुमच्या भाषेत आपोआप रिप्लाय पाठवला जाईल.

2 / 5

व्हॉट्सॲप बिझनेसची आवश्यकता: ही ऑटो-रिप्लाय सुविधा सामान्य व्हॉट्सॲपवर उपलब्ध नसून, त्यासाठी तुम्हाला 'व्हॉट्सॲप बिझनेस' (WhatsApp Business) ॲप डाउनलोड करून त्यावर प्रोफाईल तयार करावे लागेल.

3 / 5

ग्रीटिंग आणि अवे मेसेज: अँड्रॉइड किंवा आयफोनवर हे सेट करण्यासाठी सेटिंग्समधील 'Business Tools' मध्ये जाऊन, नवीन व्यक्तींसाठी 'Greeting Message' आणि तुम्ही उपलब्ध नसताना 'Away Message' हा पर्याय चालू करता येतो.

4 / 5

वेळ आणि संपर्काची निवड: यामध्ये तुमचा रिप्लाय काय असावा हे ठरवण्यासोबतच, तो कोणत्या वेळेत पाठवायचा आणि हा मेसेज सर्वांना, फक्त ठराविक नंबरला की अनेक ठराविक लोकांना पाठवायचा हे निवडण्याची पूर्ण मुभा आहे.

5 / 5

मेटा बिझनेस एजंट: काही निवडक अकाउंट्ससाठी 'मेटा बिझनेस एजंट' (Meta AI Agent) पर्यायही आला आहे जो ग्राहकांना आपोआप उत्तरे देतो, मात्र चुकीची माहिती जाऊ नये म्हणून एआयच्या या उत्तरांची नेहमी खात्री करणे आवश्यक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us