LPG Gas Booking : या लोकांना बुक केला की लगेच मिळतो गॅस, सरकारच्या यादीमध्ये तुम्ही नेमके कुठं?

इराण-इस्रायल युद्धामुळे इंधन संकट निर्माण झाले आहे. भारतात गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे. परंतु आता सरकारने गॅस सिलिंडरचे वाटप करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे.

| Updated on: Mar 14, 2026 | 11:01 PM
1 / 5
इस्रायल-इराण युद्धात इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतासह जगभरातील अनेक देशांत इंधन, उर्जेचं संकट निर्माण झालं आहे. भारतात तर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे.

इस्रायल-इराण युद्धात इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतासह जगभरातील अनेक देशांत इंधन, उर्जेचं संकट निर्माण झालं आहे. भारतात तर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे.

2 / 5

दुसरीकडे गॅस बुक केल्यानंतर तो लवकर मिळत नाहीये. 25-25 दिवस वेटिंगवर राहावे लागत आहेत. त्यामुळे गॅस संपल्यावर नेमकं काय करावं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असतानाच आता सरकारने काही घटकांना गॅस सिलिंडर मिळण्याबाबत काही नियम निश्चित केले आहेत.

3 / 5

सरकारी नियमानुसार रुग्णालय, आरोग्य संस्था यांना तत्काळ गॅस सिलिंडर दिले जाणार आहे. तत्काळ गॅस सिलिंडर मिळणाऱ्यांच्या यादीमध्ये रुग्णालये सर्वोच्च स्थानी आहेत. रुग्णांना वेळेवर जेवण मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

4 / 5

त्यानंतर संरक्षण, सुरक्षा प्रतिष्ठानांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. लष्कराचे स्वयंपाकघर, कॅन्टीन, मेस अशा ठिकाणांना तत्काळ गॅस सिलिंडर मिळायला हवे, असे सरकारचे धोरण आहे. य

5 / 5

त्यानंतर पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस वापरणाऱ्या कुटुंबांना गॅस सिलिंडर मिळायला हवे, असे सरकारचे धोरण आहे. कारण असे कुटुंब हे आर्थिक दृष्टीने कमकुवत असतात. त्यानंतर घरगुती वापरासाठी गॅस सिलिंडर दिला जाईल. गॅस डिलिव्हरीच्या प्राधान्यक्रमामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक संस्थांना शेवटचे स्थान देण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us