AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरक्षणाला आणि समलैंगिक विवाहाला संघाचा विरोध ?, काय म्हणाले मोहन भागवत?

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मुंबईत Gen Z आणि Gen Alpha पिढीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणपिढीच्या अनेक प्रश्नांना मोकळेपणे उत्तरे दिली. त्यांनी संघात महिलांना स्थान का नाही ते संघ समलैंगिक विवाहांना का मान्यता देत नाही अशा सर्व प्रश्नांना उत्तर दिली आहे.

आरक्षणाला आणि समलैंगिक विवाहाला संघाचा विरोध ?, काय म्हणाले मोहन भागवत?
Mohan Bhagwat
| Updated on: Aug 07, 2026 | 9:03 AM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)प्रमुख मोहन भागवत मुंबईत Gen Z आणि Gen Alpha विद्यार्थ्यांशी संवाद करीत आहे. त्यांनी या संवादात विद्यार्थ्यांचे आंदोलन हा देखील संवादाचा एक मार्ग आहे. विद्यार्थी या प्रकारे देखील सरकारपर्यंत आपले म्हणणे पोहचवू शकतात. मोहन भागवत म्हणाले की Gen Z आंदोलन देशाच्या विरोधात नाही, हे आंदोलन चुकीचे नाही. या दरम्यान त्यांचा समलैगिंक विवाहाबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी संघाचा समलैंगिक विवाहाला विरोध का आहे याचा खुलासा केला आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की LGBT हा समाजाचा एक हिस्सा आहेत. आपल्या सोसायटीत सिस्टीम आहे, परंपरा आहे. विवाह ही एक संस्था आहे. फॅमिली युनिट ऑफ सोसायटी आहे. नेक्स्ट जनरेशन कुटुंब वा फॅमिली या समाजाचे एक सिटीझन आहेत. वर्षांनुवर्षे ही सिस्टीम सुरु आहे. जर आपण या एक्झिंस्टींग सिस्टीमला डिस्टर्ब करु आणि नवीन सिस्टीम नसेल तर CONFLICT होईल. सोसायटी कायद्याला डिटेक्ट करते. सिस्टीमला रिपेअर करावे लागेल.मॅनरला बदलावे लागेल. याच्या पद्धती आपल्यासा कराव्या लागतील. सेम सेक्स मॅरेजसाठी कायदा तयार करावा लागेल. जो सोसायटी स्वीकारेल, पुढे स्मुथ वाढत राहील हे पाहावे लागेल.

मोहन भागवत पुढे म्हणाले की, आंदोलने हे देखील संवादाचेच एक रूप आहे; अन्यथा ते केवळ चर्चा बनून राहतात. ते पुढे म्हणाले की, जेव्हा लोक संवादात सहभागी होतात, तेव्हा सकारात्मक परिणाम दिसून येतात. लोकशाहीमध्ये, आंदोलने हे एक मत घडवण्याचे एक साधन आहे. जेव्हा लोकांच्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही, तेव्हा आंदोलन हा एक पर्याय उरतो. ‘Gen Z’ च्या तक्रारी रास्त आहेत. भारताच्या शिक्षण व्यवस्थेला सुधारणांची नितांत गरज आहे आणि त्यासाठी संवाद आवश्यक आहे.

मोहन भागवत मी असे म्हणणार नाही की Gen Z विरोध करु नये. मात्र, त्याची योग्य पद्धत असते. जर कोणी बाबासाहेब आंबेडकर यांची घटना वाचली तर त्यात तो मार्ग सांगितला आहे. आम्हाला हे समजावे लागेल की जर Gen Z  आवाज उठवत आहे. तर यासाठी हे गरजेचे आहे. जेन झी देश विरोधी नाही. ते देश विरोधी एजंट नाहीत. ते आपलेच लोक आहेत. आमची पुढची पिढी आहे. आपल्या त्यांच्यासोबत जुळवून घ्यावे लागेल.

विद्यार्थ्यांवर लाठीमार का झाला माहिती नाही…

मोहन भागवत पुढे म्हणाले मला वाटते नवीन पिढी सध्याच्या पिढीपेक्षा जास्त इमानदार आहे. माझ्याकडे याची संपूर्ण माहिती नाही की लाठीमार का झाला. मी आज बातम्यात वाचले की काही बाहेरील लोक त्या गटात घुसले होते. मला माहिती नाही हे खरे आहे की नाही ? परंतू मला जर डोळे मिठून विश्वास ठेवण्यास सांगितले तर मी Gen Z वर विश्वास ठेवणे निवडेल…

RSS मध्ये महिलांचा समावेश का नाही?

आरएसएसने विविध संस्थांमध्ये महिलांचा समावेश का नाही ? या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले की, तुमच्याकडे अर्धवट माहिती असल्याने तुम्ही हा चुकीचा प्रश्न विचारता. बहुतेक संघटनेत महिला या खांद्याला खांदा लावून नेतृत्व करत आहेत. जेव्हा संघाची स्थापना झाली तेव्हा त्याची रचना तशी होती. राष्ट्र सेवा समिती ही त्याच उद्देशाने सुरु केली. त्यांनी त्याचवेळी सांगितले की तुम्ही इकडे हस्तक्षेप करू नका. अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही अपेक्स बॉडी आहे, तिथे महिला ही निर्णय प्रक्रियेत आहेत असेही भागवत यावेळी म्हणाले.

आरक्षणाला विरोध का ?

आरक्षणाला तुमचा विरोध आहे का ? या प्रश्नावर मोहन भागवत म्हणाले की मी थेट उत्तर देणार नाही. बाबासाहेबांनी आरक्षणावर काय विचार केला होता ? सामाजिक अस्पृश्यता जोपर्यंत आहे, तोपर्यंत आरक्षण राहणार. ज्यांना फायदा मिळाला त्यांनी ते सोडायला हवे. काही लोक सोडत आहेत, हे परमानंट नाही. त्याचा वापर दुसऱ्यांसाठी व्हायला हवा. सर्व मापकांचा योग्य अवलंब केला तर लवकर त्याचा वापर संपेल. सामाजिक एकतेसाठी आरक्षण आणले होते. पण त्याचा जाणीवपूर्वक चुकीचा वापरही झाला असे उत्तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले आहे.

येथे पोस्ट वाचा…

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल