
डोनाल्ड ट्रम्प सध्या सगळीकडे चर्चेत आहेत. त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. दुसरीकडे त्यांनी एच-1बी व्हिसाच्या नियमात बदल केल्याने त्याचा सर्वाधिक फटका भारतालाच बसला आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये काम करणाऱ्या 28 वर्षीय कॅरोलीन लेविट यांची चर्चा होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या 28 वर्षीय तरुण महिलेची एकदा प्रशंसा केली होती. ती एक स्टार आहे. आतापर्यंत कधीच अमेरिकेला अशी माध्यम सचिव मिळालेली नसेल. तिचा चेहरा, तिची बुद्धी फारच चांगली आहे. ती बोलते तेव्हा तिचे ओठ एखाद्या मशीनगनप्राणे वाटतात, असे कौतुक एकदा ट्रम्प यांनी केले होते.

कॅरोलीन लेविट या अवघ्या 28 वर्षांच्या आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईड हाऊसमध्ये त्यांना अतिशय महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या सरकारचे त्या महत्त्वाचे काम करतात. म्हणूनच कॅरोलीन लेविट नेमक्या कोण आहेत? हे विचारले जात आहे.

कॅरोलीन लेविट या व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव (प्रेस सेक्रेटरी) आहेत. या पदावर काम करणाऱ्या त्या सर्वाधिक कमी वयाच्या व्यक्ती आहेत. ट्रम्प यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांत त्यांचा समावेश आहे. त्यांचा हजरजबाबीपणा, ट्रम्प तसेच सरकारची भूमिका मांडण्यात त्यांची असलेली हातोटी यामुळे ट्रम्प यांची खूप प्रशंसा करतात.

कॅरोलीन लेविट यांचा जन्म 24 ऑगस्ट 1997 रोजी अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथे झाला. त्यांनी 2019 साली कम्युनिकेशन अँड पॉलिटिकल सायन्स या विषयात पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. 2017 साली त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये इन्टर्न म्हणून काम केले होते. तेव्हा त्यांनी प्रेस ऑफिसमध्ये काम केले होते.

कॅरोलनी यांनी 2023 साली बांधकाम व्यावसायिक निकोलस रिकियो यांच्याशी लग्न केले. रिकियो कॅरोलीन लेविट यांच्यापेक्षा 32 वर्षांपेक्षा मोठे आहेत. त्यांना एक मुलगादेखील आहे. थेट उत्तरं देण्याची त्यांची शैली यामुळे त्या ट्रम्प यांच्या विश्वासू मानल्या जातात.