नरक चतुर्दशीच्या दिवशी ‘हे’ फळ पायाच्या अंगठ्याने का फोडतात?

दिवाळी हा सण पाच दिवसांचा असतो आणि या पाचही दिवसांचे वेगळे आणि पारंपरिक महत्त्व आहे. 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे, नरक चतुर्दशीचं देखीख महत्त्व आणि इतिहास आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पायाच्या अंगठ्याने एक कडू फळ फोडलं जातं. ज्याचं नाव कारटे आहे... तर जाणून घेऊ हे फळ पायाने का फोडतात.

| Updated on: Oct 19, 2025 | 3:47 PM
1 / 5
कारटे हे एक कडवट फळ असतं त्याचा सुगंध वा रस आयुर्वेदात शरीरशुद्धीसाठी उपयोगी मानला जातो. त्याचा थोडाफार उपयोग वातावरणातील जंतू नष्ट करण्यासाठी होतो, अशी मान्यता आहे.

2 / 5
नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध भगवान श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीच्या दिवशी केला होता. ‘कारटे’ हे नरकासुराचं प्रतीक मानलं जातं आणि पायाने ते फोडणं म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय दर्शवणं.

3 / 5
पायाच्या अंगठ्याने कारटे फोडणं हे अहंकार, द्वेष, क्रोध, लोभ यांसारख्या वाईट भावना नष्ट करण्याचं प्रतीक आहे. याचं आध्यात्मिक महत्व आहे.

4 / 5
ग्रामीण भागात विशेषतः महाराष्ट्रात, कारटे फोडणं ही एक जुनी लोकपरंपरा आहे. ही कृती करताना देवतेस अभिप्रेत नम्रता आणि शुद्धीचा भाव ठेवला जातो.

5 / 5
पायाने कारटे फोडणं हे "अभ्यंगस्नान" परंपरेचा एक भाग आहे. अभ्यंगस्नानापूर्वी कारटे फोडणं हे एक प्रतीकात्मक शुद्धीकरण समजलं जातं. हे फळ फोडणं म्हणजे त्या नरकाच्या अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल, अशी श्रद्धा आहे.