दारु पिताना खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांना चकणा का म्हणतात? कसं पडलं नाव?

दारूसोबत खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांना 'चकणा' हे नाव कसं पडलं, हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. भारतीय मद्यपान संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या चकण्याचं महत्त्व आणि पाश्चात्त्य बार स्नॅक्सपेक्षा त्याची वेगळी ओळख आहे.

| Updated on: Oct 03, 2025 | 4:35 PM
1 / 8
दारु म्हटलं की चकणा हा आलाच. प्रत्येक पार्टी आणि मैफलीचा अविभाज्य भाग म्हणून चकणा कडे पाहिले जाते. पण दारुसोबत खाल्ल्या जाणाऱ्या या पदार्थाला चकणा हे नाव कसं पडलं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

2 / 8
तुम्ही अनेकदा दारूसोबत शेंगदाणे, पनीर टिक्का, किंवा मसालेदार भजी खाल्ली असतील. या पदार्थांना आपण सहजपणे चकणा असे म्हणतो. पण हे नाव नेमकं कसं पडलं याची कोणतीही निश्चित ऐतिहासिक किंवा भाषिक नोंद उपलब्ध नाही.

3 / 8
मात्र, भाषातज्ज्ञांच्या मते या नावाचं मूळ हे चाखणे या क्रियापदाशी संबंधित असण्याची शक्यता आहे. कारण हे पदार्थ केवळ दारूची चव वाढवण्यासाठी आणि सोबत काहीतरी चाखण्यासाठी खाल्ले जातात.

4 / 8
चकणा या शब्दाची उत्पत्ती चाखणे (to taste) किंवा चटपटीत (spicy/tangy) या शब्दांमधून झाली असावी. दारू पिणारे लोक जी गोष्ट सोबत चाखतात, तिला चकणा हे नाव मिळाले असावे.

5 / 8
कालांतराने, हा शब्द दारूसोबत खाल्ल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या पदार्थांसाठी वापरला जाऊ लागला. तो भारतीय मद्यपान संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला.

6 / 8
भारतात चकण्याची परंपरा पाश्चात्य देशांपेक्षा वेगळी आहे. पाश्चात्य देशात बार स्नॅक्स म्हणून चीज, ऑलिव्ह खाल्ले जातात.

7 / 8
तर भारतात पंजाबी तंदूरी चिकन, मसालेदार शेंगदाणे, किंवा दक्षिण भारतीय सी-फूड स्नॅक्स असे मसालेदार आणि विविधतापूर्ण पदार्थ चकणा म्हणून खाल्ले जातात.

8 / 8
त्यामुळे चकणा हे नाव अशाप्रकारे पडल्याचे म्हटलं जाते. सध्या भारतीय मद्यपान संस्कृतीतील मैत्री, गप्पा आणि चवीच्या समन्वयाचे चकणा हा प्रतीक बनला आहे.