
अनेकजण काळ्या रंगाकडे नकारात्मकतेने पाहतात. अनकेजण या रंगाला अशुभ मानले जाते. अनेक धार्मिक कार्यात, पूजा, विवाह अशा शुभ कार्यात काळ्या रंगाचा वापर केला जात नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

अनेक लोक घरालादेखील काळा रंग देत नाहीत. शक्य असेल तिथे काळा रंग देण्याचे टाळले जाते. त्यामुळे लोक काळ्या रंगाकडे एवढ्या नकारात्मकतेने का पाहतात, हे समजून घेणे गरजेचे आहे. वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात काळ्या रंगाबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंगा हा राहूशी संबंधित आहे. त्यामुळेच काळ्या रंगाचा वापर करणे टाळावे, असे ज्योतिषी सांगतात. घरातील बेडरुमच्या भिंतींनाही काळा रंग लावू नये असे सांगितले जाते. विशेष म्हणजे लहान मुलांच्या बेडरुमला तर चुकूनही काळा रंग लावू नये, असा सल्ला दिला जातो. वास्तूशास्त्रानुसार काळा रंगाचा लहान मुलांनावर वाईट प्रभाव पडतो. मुलांमध्ये नकारात्मकता वाढते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

किचनमध्येही काळ्या रंगाचा वापर करणे टाळावे, असे वास्तूशास्त्रात सांगितले जाते. किचनमध्ये काळा रंग वापरलेला असेल तर या रंगाचा प्रभाव कमी करण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर करावा, असे वास्तूशास्त्रात सांगण्यात आलेले आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)