
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील अखेरच्या म्हणजेच पाचव्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 64 धावांची विजय मिळवला आहे. ही मालिका जिंकत टीम इंडियाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे.

टीम इंडियाने 2023-25 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 6 सामन्यात विजय मिळवला असून दोन सामन्याता पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना अनिर्णित राहिला.

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेमध्ये सलग चार सामने जिंकले. या चार सामन्यांमध्ये विजय मिळवल्यामुळे टीम इंडियाचे 74 गुण झाले आहेत. पहिल्या क्रमांकावर टीम इंडिया राज करत आहे.

न्यूझीलंडचा संघाने 5 कसोटी खेळल्या, 3 जिंकल्या आणि 2 गमावल्या आहेत. 36 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर किवी आहेत. ऑस्ट्रेलियन संघ 11 सामन्यांत 7 विजय, 3 पराभव आणि एक अनिर्णितसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी क्राइस्टचर्चमध्ये सुरू आहे. यामध्ये कोणता संघ जिंकेल तो दुसऱ्या स्थानावर उडी घेईल.

इंग्लंडचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर संघर्ष करत आहे. इंग्लंडने 10 पैकी फक्त तीन सामने जिंकले तर 6 गमावले. एक सामना अनिर्णित राहिला.