
आरजे माहवशने अपलोड केलेल्या नव्या फोटोंची तुफान चर्चा होत आहे.

या फोटोंमध्ये आरजे माहवश फारच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये ती मोकळ्या केसांत फारच सुंदर दिसते आहे.

विशेष म्हणजे नो मेकअप लूकमध्ये दिसत असली तरी तिचं सौंदर्य फारच मनोहारी वाटत आहे.

हे फोटो अलपोड करताना माहवशने सहा शब्दांचे कॅप्शन दिले आहे.

एकही शब्द बोलू नका. काही बोलण्याची गरजही नाही, असं तिनं आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.

विशेष म्हणजे तिच्या या फोटोंना आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.

काही नेटकऱ्यांनी तर क्रिकेटपटू युझवेंद्र चहलचे नाव घेत तिला ट्रोल करण्याच प्रयत्न केलाय.

एका नेटककऱ्याने अरे ही तर आपल्या चहलभाईची अप्सरा आहे, असं म्हटलंय. दरम्यान, युझवेंद्र आणि आर जे माहवश हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. हे दोघे अनेकवेळा एकमेकांसोबत दिसले आहेत.