मौलानाशी निकाह करण्याआधी कशी होती सना खान? झरीन म्हणाली “लोकांना ग्लॅमरस महिला..”

अभिनेत्री सना खान मौलानाशी निकाह करण्याआधी कशी होती, याविषयीचा खुलासा अभिनेत्री झरीन खानने केला. सनाने धर्माचं कारण देत अभिनयक्षेत्राला रामराम केलं होतं. त्यानंतर तिने मुफ्ती अनस सय्यदशी निकाह केला. निकाहनंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं.

| Updated on: Jul 17, 2025 | 4:01 PM
1 / 5
अभिनेत्री सना खानने धर्माचं कारण देत ग्लॅमर विश्वाला कायमचा रामराम केला. त्यानंतर ती हिजाब घालू लागली. सनाने मुफ्ती मोहम्मद सय्यदशी लग्न केलं असून तिने अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडलं आहे. आता ती पतीसोबत मिळून इतरांना इस्लामचे धडे देताना दिसते.

2 / 5
यामुळे सना खान अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. आता अभिनेत्री झरीन खानने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत झरीन सनाच्या निर्णयावर मोकळपणे व्यक्त झाली. त्याचप्रमाणे सना सुरुवातीपासूनच धार्मिक असल्याचं तिने सांगितलं.

3 / 5
"मी सनाची खास मैत्रीण नाही, परंतु तिच्या निर्णयांचा आदर केला पाहिजे, हे मला माहीत आहे. मी तिला थोडंफार ओळखते. आता तिने पूर्णपणे तिच्या धर्माचा स्वीकार केला आहे", असं झरीन म्हणाली.

4 / 5
याविषयी तिने पुढे सांगितलं, "परंतु लोकांना ही गोष्ट माहीत नाही की जेव्हा ती इंडस्ट्रीमध्ये होती, तेव्हासुद्धा ती तितकीच धार्मिक होती. ती नियमित नमाज पठण करायची. दुर्दैवाने, जोपर्यंत लोकांना एखाद्याच्या श्रद्धेचा पुरावा मिळत नाही, तोपर्यंत ते विश्वास ठेवत नाहीत. लोकांना वाटतं की ग्लॅमरस महिला धार्मिक होऊ शकत नाहीत."

5 / 5
"आम्ही आमच्या आयुष्यात काय करतो, हे लोकांना कसं कळणार? प्रामाणिकपणा हे तुमच्या आणि अल्लाहमधील खूप खासगीतचं नातं आहे. त्याला दाखवण्याची गरज नसते. सना आधीपासूनच धार्मिक होती. परंतु जेव्हा तिचं लग्न मौलानाशी झालं, तेव्हापासून ती पूर्णपणे बदलली. हे तिचं आयुष्य आहे आणि मी तिच्यासाठी खुश आहे", असं मत झरीनने मांडलं.