‘चौकीदार चोर है’ने 30 वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ घोषणेचा बदला?

‘चौकीदार चोर है’ने 30 वर्षांपूर्वीच्या 'त्या' घोषणेचा बदला?

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रत्येक सभेत एकच नारा आहे आणि तो म्हणजे ‘चौकीदार चोर है’. राफेल विमान व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात हा नारा दिलाय. पण देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हणण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1989 ची निवडणूक आणि 2019 ची निवडणूक यामध्ये अनेक गोष्टीत साम्य दिसून येतं. कारण, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधातही अशाच प्रकारचा नारा दिला जात होता.

चोर हा शब्द वापरलेले मोदी पहिलेच पंतप्रधान नाहीत. 30 वर्षांपूर्वी राजीव गांधींसाठी विरोधकांनी एक नारा दिला होता. ‘गली गली में शोर है, राजीव गांधी चोर है’ असा तो नारा होता आणि 1989 च्या लोकसभा निवडणुकीत हा नारा प्रचंड गाजला. तेव्हा भाजपही प्रमुख विरोधी पक्ष होता. काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं असताना जनतेच्या मताचा आदर राखला जात नाही, असं भाजपचं मत होतं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 541 पैकी 414 जागा मिळाल्या होत्या. भारतीय इतिहासातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय आहे.

टेलीग्राफच्या वृत्तानुसार, 2019 आणि 1989 च्या निवडणुकीत बहुमत आणि चोर हाच नारा सारखा नव्हता. भाजपविरोधात आज ज्याप्रमाणे विविध पक्ष एकवटले आहेत, त्याच पद्धतीने सर्व पक्ष काँग्रेसविरोधात एकवटले होते. जनता दलच व्हीपी सिंह यांच्या नेतृत्त्वात सर्व पक्षांनी राजीव गांधींना हरवण्यासाठी एकजूट केली होती. पंतप्रधान मोदींकडून आज विरोधकांना महामिलावट म्हटलं जातं. तेव्हा राजीव गांधीही असंच म्हणायचे. गठबंधनमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच जास्त झाल्याचं राजीव गांधी म्हणायचे.

या समानतांसोबतच 1989 च्या निवडणुकीत काही फरकही होते. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे सूचनेचं एकमेव साधन हे वृत्तपत्र होतं, ज्यावर फोटोशॉप केलेले फोटो आणि फेक न्यूज व्हायरल करता येत नव्हती. टीव्ही आणि रेडिओतूनही लोकांसमोर खोट्या गोष्टी व्हायरल करता येत नव्हत्या. पण चोर हा शब्द तेव्हा सर्वात भडकाऊ मानला जायचा.

Published On - 6:19 pm, Sat, 11 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI