हातकणंगलेत 459 मते जादा निघाली, राजू शेट्टींची निवडणूक आयोगाकडे तक्रार

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीदरम्यान 459 मते जास्त निघाल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ माजली असून पुन्हा एकदा ईव्हीएमवर (EVM) संशय व्यक्त केला जात आहे. राजू शेट्टी यांनी या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले, “हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएमद्वारे एकूण […]

हातकणंगलेत 459 मते जादा निघाली, राजू शेट्टींची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Follow us
| Updated on: May 31, 2019 | 9:54 AM

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीदरम्यान 459 मते जास्त निघाल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ माजली असून पुन्हा एकदा ईव्हीएमवर (EVM) संशय व्यक्त केला जात आहे.

राजू शेट्टी यांनी या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले, “हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएमद्वारे एकूण 12 लाख 45 हजार 797 मतदान झाले होते. मात्र, मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये 12 लाख 46 हजार 256 मते मोजली गेली. याप्रमाणे झालेल्या मतदानापेक्षा एकूण 459 मते जादा झाली आहेत.” यामध्ये पोस्टलची मते धरलेली नसल्याचेही राजू शेट्टी यांनी नमूद केले.

दरम्यान, दोनदा खासदार राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना या लोकसभा निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. 5 वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेल्या माने घराण्यातील धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढत शेट्टींचा पराभव केला. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. एक कोल्हापूर आणि दुसरा हातकणंगले. हातकणंगले मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. या लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेमध्ये 70.28 टक्के इतकं मतदान झालं होतं. मात्र 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2 टक्के मतदान कमी झाले होते. 2014 मध्ये याठिकाणी 72.09 टक्के इतकं मतदान झालं होतं.

हातकणंगले लोकसभा अंतिम निकाल

  • झालेलं मतदान : 12,26,923
  • मोजलेलं मतदान: 12,26,923
  • धैर्यशील माने (शिवसेना) : 5,74,077
  • राजू शेट्टी ( स्वा. शेतकरी संघटना): 4,80,292
  • वंचित : 1,20,584
  • धैर्यशील माने 93,785 मतांनी विजयी

या लढतीला महत्व का आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीकास्त्र सोडून राष्ट्रीय पातळीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळख मिळवली. त्यामुळं त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपनं सर्व ताकद माने यांच्या पाठिशी उभा केली होती. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली. त्याचा फटका थेट सरकारलादेखील बसला. त्याविरोधात धैर्यशील माने यांनीही शेतकरी, तरुण, व्यापारी आणि उद्योजक यांचे मुद्दे घेत निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यामुळं एक मुरब्बी राजकारणी विरुद्ध तरुण तडफदार उमेदवार असं चित्र याठिकाणी पाहायला मिळालं. विशेष म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.