भाजपशी बंडखोरी करणाऱ्या 'या' 7 खासदारांना जनतेकडून शिक्षा?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने बहुमत मिळवले आहे. हा विजय नरेंद्र मोदींसाठी एक चमत्काराच ठरला आहे. विरोधी पक्षांनी मोदींना हटवण्यासाठी मतं मागितली होती. पण आता जनतेने आपली मतं करुन सिद्ध केलं आहे की, मोदींना हटवणे कठीण नाही. आज संपूर्ण देशात भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. पण काही लोक असे आहेत जे …

भाजपशी बंडखोरी करणाऱ्या 'या' 7 खासदारांना जनतेकडून शिक्षा?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने बहुमत मिळवले आहे. हा विजय नरेंद्र मोदींसाठी एक चमत्काराच ठरला आहे. विरोधी पक्षांनी मोदींना हटवण्यासाठी मतं मागितली होती. पण आता जनतेने आपली मतं करुन सिद्ध केलं आहे की, मोदींना हटवणे कठीण नाही. आज संपूर्ण देशात भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. पण काही लोक असे आहेत जे निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले होते आणि निवडणूक मैदानात उतरले होते. पण अशा नेत्यांना आज जनतेकडून पराभव पत्कारावा लागत आहे.

गेल्या लोकसभा म्हणजेच 2014 च्या निवडणुकी दरम्यान, मोदी लाटेत विजय मिळवलेले खासदार 2019 आल्यावर दुसऱ्या पक्षात गेले आहेत. अशा खासदारांना यंदा मात्र पराभव पत्कारावा लागला आहे.

शत्रुघ्न सिन्हा (पटना साहिब, बिहार)

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला रामराम करत शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते काँग्रेसच्या तिकिटावर बिहारमधून पटना साहिब येथून निवडणूक रिंगणात उतरले होते. शत्रुघ्न सिन्हांच्या विरोधात भाजपचे केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद होते. पटना साहिब येथून शत्रुघ्न सिन्हा यांना जनतेने नाकारले आणि रवी शंकर प्रसाद यांना विजयी केले.

किर्ती आझाद (धनबाद, झारखंड)

काँग्रेस उमेदवार आणि माजी खेळाडू किर्ती आझाद धनबाद लोकसभा जागेवरुन निवडणुकीत पराभूत झाले. या जागेवर भाजपच्या पी. एन. सिंह यांनी बाजी मारली आहे. 2014 मध्ये किर्ती आझाद दरभंगा लोकसभा जागेवरुन विजयी झाले होते. किर्ती आझाद यांनी भाजपाविरोधात आवाज उठवला होता त्यामुळे त्यांना भाजपाने निलंबीत केले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

अशोक कुमार दोहरे (इटावा, उत्तर प्रदेश)

2014 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अशोक कुमरा दोहरे यांनी विजय मिळवला होता. पण यानंतर त्यांनी पक्षावर टीका केली. शेवटी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण आता अशोक कुमार दोहरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर इटावा येथून निवडणूक लढवली आणि त्यांना पराभव पत्कारावा लागला. भाजपा उमेदवाराने अशोक दोहरे यांचा पराभव केला आहे.

नाना पटोले (नागपूर, महाराष्ट्र)

2014 मध्ये लातूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर विजय मिळवलेल्या पटोलेंना यंदा 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर नागपूर येथून पराभव पत्कारावा लागला. भाजपामधील अंतर्गत वादावरुन नाना पटोले यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नाना पटोले नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते आणि पटोलेंच्या विरोधात नितीन गडकरी होते.

सावित्री बाई फुले (बहराईच, उत्तर प्रदेश)

भाजपासोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सावित्री बाई फुले यांनी देखील यंदाच्या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला आहे. निवडणुकीपूर्वी सावित्री बाई फुले यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि बहराईच येथून भाजपविरोधात निवडणूक लढवली होती. भाजपने सावित्री यांच्या विरोधात अक्षयबर लाल यांना तिकिट दिले होते. मात्र बहराईच येथील जनतेने सावित्री यांना नाकारले आहे.

श्याम चरण गुप्ता (बांदा, उत्तर प्रदेश)

उत्तर प्रदेशच्या बांदा मतदारसंघात यावेळी सपा-बसपा-आरएलडी महागठबंधनकडून श्याम चरण गुप्ता निवडणूक रिंगणात उतरले होते. येथून भाजपचे आर. के. सिंह यांना तिकिट दिली होती. मात्र श्याम चरण गुप्ता यांना येथून पराभव पत्कारावा लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी गुप्ता यांनी भाजप सोडून समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये गुप्ता इलाहबाद येथून निवडणूक लढवत विजयी झाले होते.

मानवेंद्र सिंह (बाडमेर, राजस्थान)

मानवेंद्र सिंह काही महिन्यापूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसने मानवेंद्र यांना बाडमेर येथून तिकिट दिली होती. पण भाजपाच्या कैलाश चौधरी यांनी त्यांचा पराभव केला होता. माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *