AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंसोबतच्या युतीवर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? वाचा…

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा चालू आहे.आता आमदार आदित्य ठाकरे यांनीही या युतीवर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज ठाकरेंसोबतच्या युतीवर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? वाचा...
aaditya thackeray
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 08, 2025 | 8:15 PM
Share

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा चालू आहे. महत्वाची बाब म्हणजे दोन्ही पक्षातील नेत्यांनी या युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. अशातच आता आमदार आदित्य ठाकरे यांनीही या युतीवर भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

पत्रकाराशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांना मनसेसोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना आदित्य यांनी म्हटले की, राज्यावर अनेक अत्याचार होत आहेत. यात कुठेतरी बदल घडवण ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे जे पक्ष महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत त्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे असं सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरेंच सूचक विधान

याआधी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘बघु, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल’. मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर तुम्ही काय संदेश द्याल? यावर प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “संदेश कशाला? मी बातमीच देईन तुम्हाला.शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही. आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ”.

ठाकरे गट युतीसाठी सकारात्मक- किशोरी पेडणेकर

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमच्या बाजूने या युतीसाठी सकारात्मक आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. ‘2022 साला महाराष्ट्रात राजकाराणाचा चिखल झाला. यामुळे नागरिक तसेच सगळ्यांनाच त्रास होत आहे. कारण परप्रांतीय लोकांचे प्राबल्य वाढत आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून ते आमच्यापर्यंत असे सगळेच लोक या युतीसाठी सकारात्मक आहोत. संजय राऊतांनी तर आता मागे वळून पाहायचं नाही, असं सांगितलं आहे. मागे वळून पाहिलं की चिखल दिसेल. त्यामुळे मागे पाहायचं नाही पुढे पाहुया’, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गट मनसेशी युती करायला सकारात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?