आदित्य ठाकरे म्हणजे ‘छोटा पप्पू’; अब्दुल सत्तार असं का म्हणाले?

अधिकाऱ्याला दारू घेता का? या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तो व्हिडीओ कालचा नाही. बीडच्या दौऱ्याचा हा व्हिडिओ आहे. आम्ही चहा घेण्यासाठी बसलो होतो.

आदित्य ठाकरे म्हणजे 'छोटा पप्पू'; अब्दुल सत्तार असं का म्हणाले?
आदित्य ठाकरे म्हणजे 'छोटा पप्पू'; अब्दुल सत्तार असं का म्हणाले?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 10:51 AM

हिंगोली: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत (shivsena) आधी प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलं. आदित्य ठाकरे यांनाही आपला नेता मानलं. आज ते तेच अब्दुल सत्तार (abdul sattar) ठाकरे कुटुंबावर घणाघाती हल्ला करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्तार यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर टीका करतानाच ठाकरे घराण्यावरही जोरदार हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. आता तर त्यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सत्तार आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अधिकाऱ्याला दारू पिता का? असा सवाल केला होता. त्यावरून विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केला.

हे सुद्धा वाचा

राज्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर अब्दुल सत्तार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. आदित्य ठाकरे सांगतात तो प्रकल्प कधी गेला? कसा गेला? तारीख कोणती होती? तारीख होती 21 सप्टेंबर 2021 ला प्रकल्प गुजरातला गेला. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? त्यांचे वडीलच मुख्यमंत्री होते. तर आरोप करणारे स्वत: कॅबिनेट मंत्री होते. यांच्याशी देवाणघेवाण करणं राहिलं असेल म्हणून प्रकल्प गुजरातला गेला असावा अशी लोकांत चर्चा आहे, अशी टीका त्यांनी केली.

छोटा पप्पू जे बोलतोय ते आधी बोलले असते. आधीच तो प्रकल्प राज्यात राहण्यासाठी काम केलं असंत तर आज ही परिस्थिती झाली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला.

अधिकाऱ्याला दारू घेता का? या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तो व्हिडीओ कालचा नाही. बीडच्या दौऱ्याचा हा व्हिडिओ आहे. आम्ही चहा घेण्यासाठी बसलो होतो. तिथे ते कर्तव्यदक्ष अधिकारी होते. आम्ही गप्पा मारत होतो. खेळीमेळीचं वातावरण होतं. तेव्हा मी अधिकाऱ्याला चहा घ्या असा आग्रह केला. त्यावर, मी चहा घेत नाही, असं त्यांनी म्हटलं. तेव्हा तुम्ही दुसरं काही घेतला का? असं मी गंमतीत म्हटलं. खरं तर हे सर्व गंमतीत सुरू होतं. असं काही बोलणं पाप आहे, हे मला कुठं माहीत होतं? विरोधक पराचा कावळा करतील हे माहीत नव्हतं; असा टोलाही त्यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.