Abdul Sattar : आदित्य ठाकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मीही राजीनामा देऊन लढेन, अब्दुल सत्तारांचं थेट आव्हान

इतका फुलांचा वर्षाव, इतकं प्रेम लोकांकडून मिळतंय. गेल्या काही दिवसात काही लोकांनी तुमच्याबद्दल अपशब्द बोलण्याचं पाप झालं त्याचं उत्तर हे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

Abdul Sattar : आदित्य ठाकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मीही राजीनामा देऊन लढेन, अब्दुल सत्तारांचं थेट आव्हान
आदित्य ठाकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मीही राजीनामा देऊन लढेन, अब्दुल सत्तारांचं थेट आव्हान
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

|

Jul 31, 2022 | 8:14 PM

औरंगाबाद : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांना सत्तत गद्दार बोलत आहे. त्यानंतर आज शिंदे गटातील आमदार अब्दुल (Abdul Sattar) सत्तार यांनी आक्रमक होत मुख्यमंत्र्यांसमोरूनच (Cm Eknath Shinde) थेट आदित्य ठाकरेंना आव्हान दिलंय. तुम्हीही राजीनामा द्या, मीही राजीनामा द्या, मग थेट लढू, तेव्हा कळेल कोण गद्दार आहे, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंविरोधात थेट रणशिंग फुंकलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही आदित्य ठाकरे यांनी असेच वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना सत्तार म्हणाले, मी राजकारणामध्ये मंत्री झालो होतो. मी आमदार झालो, त्यावेळेस मी इतकी पब्लिक कधी पाहिली नाही. इतका फुलांचा वर्षाव, इतकं प्रेम लोकांकडून मिळतंय. गेल्या काही दिवसात काही लोकांनी तुमच्याबद्दल अपशब्द बोलण्याचं पाप झालं त्याचं उत्तर हे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

तुम्ही मोदींचे फोटो लावून लढला

तसेच मी आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज देतो, विधानसभेमध्ये तुम्ही नरेंद्र मोदी साहेब आणि शाह साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा फोटो छापून निवडणूक लढवली. आदित्य साहेबांनी तिकडे राजीनामा द्यावा, मी सिल्लोडमध्ये इकडे राजीनामा देतो. थेट लढूया,  सर्व जनता याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत सत्तार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही गद्दार आहात. राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकांना समोरे जा, असे आव्हान या बंडखोर आमदारांना देत आहे. सुरूवातील तर या आमदारांनी धीरानं घेतलं. मात्र आता हे आमदार आदित्य ठाकरेंविरोधातही आक्रमक झाले आहेत.

वाद होणार नाही याची काळजी घेऊ

तर जनता ज्यावेळेस येते तेव्हा त्यांना माहित आहे की अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर या दोघांचा रिमोट कंट्रोल आता एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. तिकडे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. नंतर आमच्या दोघांमध्ये वाद होणार नाही याची दक्षता मी आणि अर्जुनराव निश्चित घेऊ असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंनी काय काय दिलं?

या मतदारसंघासाठी साहेब तुम्ही सूतगिरणी दिली. त्याचे उपकार कधीही आमचा शेतकरी विसरणार नाही, या ठिकाणी बसलेली तमाम जनता प्यायला पाणी नव्हतं, आपण जे खडकपूर्णांमधून पाणी दिलं, आता शुद्ध पाणी मिळेल शुद्ध पाणी त्याला प्यायला मिळेल, याचा मला आनंद होतो आहे, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनंही उधळली आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें