Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
Abhijeet Dipke CJP Founder: कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी ग्वाल्हेरमधील कार-किसिंग प्रकरणाचा संदर्भ देत राम रहीम सिंगला दिलेल्या पॅरोलवर टीका केली आहे.

Abhijeet Dipke CJP Founder: कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी ग्वाल्हेरमधील कार-किसिंग प्रकरणाचा संदर्भ देत राम रहीम सिंगला दिलेल्या पॅरोलवर टीका केली आहे. सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके यांनी मध्य प्रदेशातील त्या घटनेवरून हरियाणा भाजप सरकारवर निशाणा साधला आहे, ज्यात एका इंस्टाग्राम युजरने कारवर ३,४०० चुंबनांचे फोटो पोस्ट केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला होता.
सीजेपी नेत्याने म्हटले की, लिपस्टिकच्या खुणेऐवजी ‘राम रहीम’ बाबाचा फोटो लावायला हवा होते. बलात्कार प्रकरणातील दोषी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पुन्हा एकदा पॅरोल (ठराविक कालावधीसाठी तुरुंगातून तात्पुरती सुटका) दिल्याबद्दल विरोधी पक्ष हरियाणा सरकारवर टीका केली आहे.
एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला ३,४०० वेळा गाडीचे चुंबन घ्यायला लावले. यानंतर त्या मुलाला पोलिसांनी चांगला चोप दिला. तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि पोलिसांनी त्याला गाडी स्वच्छ करायलाही लावली. दीपके यांनी या प्रकरणावर टीका करताना म्हटले की, “त्याऐवजी त्यांनी राम रहीमचे स्टिकर लावायला हवे होते.”
ही कारची घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे घडली. आदित्य सिकरवार नावाच्या एका तरुणाने लिपस्टिकने चुंबन केलेल्या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तो व्हायरल झाला आणि एकाच दिवसात त्याला ५५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. नंतर, पोलिसांनी स्टंट आणि अतिवेगासाठी चलन जारी केले आणि गाडी स्वच्छही करून घेतली. लोक सिकरवारच्या कृतीवर आणि त्याला मिळालेल्या शिक्षेवर चर्चा करत असताना अभिजीत दिपके यांनी मात्र वेगळ्या पद्धतीने निशाणा साधला आहे.
मंगळवारी, डेरा प्रमुखाची हरियाणातील रोहतक येथील सुनारिया तुरुंगातून २१ दिवसांच्या पॅरोलवर सुटका करण्यात आली. ऑगस्ट २०१७ मध्ये दोषी ठरल्यापासून तुरुंगातून सुटका होण्याची ही १७ वी वेळ आहे. राम रहीम आपल्या दोन अनुयायांवर बलात्कार केल्याबद्दल २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत असून सध्या तो हरियाणातील रोहतक येथील सुनारिया तुरुंगात आहे. या वर्षातील ही त्याची तिसरी सुटका आहे. यापूर्वी, त्याला जानेवारीमध्ये ४० दिवसांसाठी आणि मेमध्ये ३० दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी राम रहीमला वारंवार दिलासा दिल्याबद्दल हरियाणा सरकारवर टीका केली आहे.
