AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन लोकांची मदत कधीच घेऊ नका, येईल पश्चतापाची वेळ

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Niti : या तीन लोकांची मदत कधीच घेऊ नका, येईल पश्चतापाची वेळ
Chanakya NitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 26, 2026 | 2:33 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात जे गरजू लोक आहेत, त्यांना आपण मदत केली पाहिजे. त्यामाध्यमातून आपल्याला पुण्य तर मिळतंच, पंरतु आपण जशी एखाद्याला मदत करतो, तशीच मदत आपल्याला इतर लोकही करत असतात.  परंतु आपण मदत कोणाकडून घेतली पाहिजे याचे देखील काही नियम आहेत.  जर तुम्ही चुकीच्या लोकांकडून मदत घेतली तर आयुष्यभर त्यांच्या उपकाराचं ओझ तुमच्या डोक्यावर राहील आणि तुमच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

स्वर्थी मित्र – चाणक्य म्हणतात आयुष्यात काहीही करा, कशीही परिस्थिती येऊ द्या, परंतु जे स्वार्थी मित्र आहेत, त्यांच्याकडून आयुष्यात कधीही मदत घेऊ नका. कारण असे मित्र कायम त्यांचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवूनच तुमची मदत करत असतात. त्यामुळे आज त्यांनी तुम्हाला मदत केली, उद्या तुम्ही देखील त्यांची मदत कराल ही त्यांना अपेक्षा असते, ते तुम्हाला केलेल्या मदतीच्या बदल्यात कितीतरी अधिक पटीने तुमच्याकडून त्यांचा फायदा करून घेतात. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांकडून कधीही मदत घेऊ नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

वांरवार बोलून दाखवणारे लोकं – काही लोक हे तुम्हाला मदत तर करतात, परंतु ती गोष्ट ते अनकांसमोर बोलून दाखवतात. कधी-कधी तर ते तुमच्या तोंडावर बोलण्यास देखील मागे-पुढे पहात नाहीत, त्यामुळे तुमच्यावर अपमानाची वेळ येऊ शकते.

वाईट कर्म करणारे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक वाईट कर्म करतात, अशा लोकांकडून तुम्ही कधीही मदत घेतली नाही पाहिजे. यामुळे तुमच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा...
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय
थकीत बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, वडेट्टीवारांनी सरकारवर साधल निशाणा
गजानन देवकते प्रकरण: थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर साधला निशाणा.
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर...
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल