मोदी आणि शाह या देशाला लागलेला कलंक : राज ठाकरे

कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल सुरुच आहे. मोदी आणि अमित शाह हे दोघे या देशाला लागलेले कलंक आहेत, ते लोकशाही संपवून टाकतील, असा घणाघात त्यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये राज ठाकरेंनी सभा घेतली. या सभेतून त्यांनी पंतप्रधान मोदींची जुनी आश्वासनं आणि जुनी भाषणं दाखवत टीका केली. शहीद जवानांच्या नावाने मतं […]

मोदी आणि शाह या देशाला लागलेला कलंक : राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल सुरुच आहे. मोदी आणि अमित शाह हे दोघे या देशाला लागलेले कलंक आहेत, ते लोकशाही संपवून टाकतील, असा घणाघात त्यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये राज ठाकरेंनी सभा घेतली. या सभेतून त्यांनी पंतप्रधान मोदींची जुनी आश्वासनं आणि जुनी भाषणं दाखवत टीका केली. शहीद जवानांच्या नावाने मतं मागितली जात आहेत. देशाला जी स्वप्न दाखवली, त्यावर एक शब्द बोलला जात नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. त्यांनी मोदींच्या जुन्या भाषणाचे व्हिडीओही सभेत दाखवले.

“मी निवडणूक लढवत नाही, माझा उमेदवार नाही तरीही भाजपवाले फडफडत आहेत, निवडणूक आयोगाला विचारत आहेत कुठल्या खात्यात खर्च मोजायचा. कुठल्या खात्यात म्हणजे आमच्या खात्यात, असं राज ठाकरे म्हणाले. शिवाय त्यापेक्षा मी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, मी ज्या पद्धतीने प्रश्न विचारतोय त्याचा एक फायदा लक्षात घ्या की यापुढे कुठलाही राजकारणी खोटं बोलणार नाही, तुम्हाला गृहीत धरणार नाही, कारण ते खोटं बोलले तर अशा क्लिप्स बाहेर येतील आणि लोक प्रश्न विचारतील, असंही ते म्हणाले.

“झटका आला आणि नोटाबंदी केली”

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तींनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदा बाहेर येऊन पत्रकार परिषद घेऊन लोकशाही धोक्यात आहे हे सांगितलं. कारण, जस्टीस लोया यांच्या मृत्यूबाबत काही शंका होत्या आणि त्याचा संबंध भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी होता. रिझर्व्ह बँकेच्या दोन गव्हर्नर्सनी राजीनामा दिला. नोटाबंदी करताना आरबीआयच्या गव्हर्नंरना विश्वासात नाही घेतलं, अर्थमंत्र्याला विश्वासात घेतलं नाही, मंत्रिमंडळाला विश्वासात घेतलं नाही. एका माणसाला झटका आला आणि त्यांनी नोटा बंद करून टाकल्या, असा घणाघात राज ठाकरेंनी केला.

“काळ्या पैशाच्या नावावर फसवणूक”

“देशाबाहेरचा काळा पैसा आणण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करू, गरज पडली तर कायदे बदलू, आणि कसंही करून देशात काळा पैसा आणू आणि नोकरदारांना त्यांच्या प्रामाणिकतेसाठी त्यातला काही भाग देऊ, असं मोदी म्हणाले होते आणि अमित शाह सत्तेत आल्यावर म्हणाले हा तर चुनावी जुमला होता. मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान आजवर पाहिला नाही. बिहारमध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले 1 आठवड्यात 50 लाख शौचालय बांधली. काय बोलत आहेत पंतप्रधान, असं राज ठाकरे म्हणाले.

“मोदींना मिळणारे पुरस्कार स्पॉन्सर्ड”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झालाय. त्याअगोदरही मोदींना विविध देशांकडून आणि संयुक्त राष्ट्राकडून मिळून सहा पुरस्कार जाहीर झाले होते. हे पुरस्कार स्पॉन्सर्ड असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय.

“बेसावध राहू नका, लोकशाही धोक्यात आहे”

“बेसावध राहू नका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की 2014 ला झालं ते झालं. एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जाऊ. या देशातील राजकीय क्षितिजावरून मोदी आणि शाह यांना आपल्याला हटवायचं आहे. म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे. सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, रिझर्व्ह बँक यांसारख्या स्वायत्त संस्थाना हात घालून ह्यांनी लोकशाही धोक्यात आणली. हेच 1930 ला जर्मनीत हिटलर करत होता. प्रचारासाठी हिटलर फिल्म काढायचे आणि नेमकं हेच मोदी आज करत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.

VIDEO : राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.