फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा…सचिन वाझेप्रकरणी अबू आझमींचे मोठे गौप्यस्फोट!

वाझे पुन्हा नोकरीत आला नसता तर राजकारणातील कटू प्रसंग टाळता आले असते असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. वाझेला पुन्हा सेवेत घेऊ नया या मागणीला घेऊन मी पवारांना भेटलो होतो, असेही राऊत म्हणाले आहेत.

फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा...सचिन वाझेप्रकरणी अबू आझमींचे मोठे गौप्यस्फोट!
sachin waze and abu azmi
| Updated on: May 18, 2025 | 4:33 PM

Sanjay Raut On Sachin Waze : वाझे पुन्हा नोकरीत आला नसता तर राजकारणातील कटू प्रसंग टाळता आले असते असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. वाझेला पुन्हा सेवेत घेऊ नया या मागणीला घेऊन मी पवारांना भेटलो होतो, असेही राऊत म्हणाले आहेत. यावर आता सपाचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाझेला पुन्हा सेवेत घेणं चुकीचंच होतं, असं आझमी म्हणालेत.

…असे असताना वाझेला नोकरीवर घेणे चुकीचे होते- आझमी

सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीवर घेण्याची बातमी आली तेव्हा मी संजय राऊत यांची मी भेट घेतली होती. हा फार मोठा अन्याय आहे. ख्वाजा युनूस यांना मारण्याचा खटला अजूनही त्यांच्यावर चालू आहे. असे असताना पुन्हा सेवेत घेणं चुकीचं आहे, असं मी त्यांना म्हणालो होतो. शरद पवार यांनीही आम्ही वाझे यांना सेवेत घेणार नाही, असं सांगितलं होतं. पण थोड्या दिवसांनी वाझेला सेवेत घेण्यात आलं.

परमबीर सिंह यांनी कॉल केला होता

तत्कालीन पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी मला कॉल केला होता. वाझे यांना सेवेत घेऊ द्या, तुम्ही मध्ये येऊ नका, असे त्यांनी मला सांगितले. सोतबच ख्वाजा युनूस यांच्या आईला आम्ही मदत करू, असेही परमबीर सिंह म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा देखील वाझे यांना सेवेवर घेण्याविषयी विचार होत होता. पण तेव्हा त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात आलं नाही, असा गौप्यस्फोट अबू आजमी यांनी केला.

राऊत काय म्हणाले होते?

संबंधित व्यक्तीला सेवेत घेण्यासंदर्भात एक शासकीय निर्णय झाला. पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार ते सेवेत येऊ शकत नव्हते. सचिन वाझे यांना मी चांगल्या प्रकारे ओळखत होतो. त्यांना पुन्हा सेवेत घेऊ नये असे माझे मत आहे. सचिन वाझे हे पुन्हा नोकरीत येऊ नयेत किंवा त्यांना घेतलं जाऊ नये, यासाठी मी स्वत: शरद पवार यांना भेटलो होतो. पण तोपर्यंत बरेचसे निर्णय झाले होते.