कोण कुणाल भाषण लिहून देतंय? कोण बदलणार भाषणाचा लेखक? यावरुन विरोधकांमध्ये जुंपली

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटाच्या नेत्या शीत म्हात्रे यांनी जबरदस्त पलटवार केला आहे.

कोण कुणाल भाषण लिहून देतंय? कोण बदलणार भाषणाचा लेखक? यावरुन विरोधकांमध्ये जुंपली
वनिता कांबळे

|

Oct 06, 2022 | 8:06 PM

मुंबई : शिंदे गटाचा दसरा मेळावा BKC मैदानावर पार पडला. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावरुन ठाकरे गटातील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या भाषणावरुन महिला नेत्यांमध्ये जुंपली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटाच्या नेत्या शीत म्हात्रे(Sheetal Mhatre) यांनी जबरदस्त पलटवार केला आहे. कोण कुणाल भाषण लिहून देतंय? कोण बदलणार भाषणाचा लेखक? यावरुन विरोधकांमध्ये .चांगलीच जुंपली आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण म्हणजे भाजपने लिहीलेली स्क्रिप्ट असल्याचा घणाघाती आरोप ठाकरे गटातील नेत्यांकडून केला जात आहे. सुषमा अंधारे यांनी देखील स्क्रीप्टवरुन टीका केली आहे.

त्यांनी स्क्रिप्ट रायटर बदलायचा की नाही ते नंतर बघू. परंतु मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला तुम्ही कागद देणे कधी थांबवणार असा सवाल? उपस्थित करत अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

तर, शिंदे गटाच्या नेत्या शीत म्हात्रे यांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. सुषमा अंधारे यांना दोन तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षातून आयात करुन शिवसेनेत आणले आहे.

सुषमा अंधारे यांनी भगवा घेऊन अजून एक आंदोलनही केलेले नाही. शिवसेनेच्या कुठल्याही आंदोलनात त्या सहभागी झालेल्या नाहीत.
केसेस अंगावर घेणाऱ्यांना गद्दार म्हणाल्या. सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं’ असं म्हणत शितल म्हात्रेंनी पलटवार केला आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें