अभिनेता सनी देओलही निवडणुकीच्या रिंगणात?

चंदीगढ: संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध राजकीय पक्षांकडून सिनेसृष्टीतील कलाकारांना उमेदवारी देण्यात येत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा असताना, आता बॉलिवूड अभिनेता सनी देओलही भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांनी देलेल्या माहितीनुसार …

अभिनेता सनी देओलही निवडणुकीच्या रिंगणात?

चंदीगढ: संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध राजकीय पक्षांकडून सिनेसृष्टीतील कलाकारांना उमेदवारी देण्यात येत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा असताना, आता बॉलिवूड अभिनेता सनी देओलही भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सूत्रांनी देलेल्या माहितीनुसार अभिनेता सनी देओलला पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यास भाजप इच्छुक आहे. पण सनी मात्र निवडणूक लढण्याबाबत फारसा उत्सुक नाही. त्यामुळे सनीला निवडणूक लढण्यास तयार करण्याची जबाबदारी त्याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर देण्यात आली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच याबाबत सनीनेही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

हे कलाकार निवडणुकीच्या रिंगणात

अभिनेता सनी देओलही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची शक्यता असताना प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा, हेमामालिनी या दोघींचीही निवडणूक लढणार आहेत. त्याशिवाय सध्या अभिनेता सलमान खान, अभिनेत्री सनी लिओन यासारख्या कलाकारांची नावं आधी चर्चेत होती.

अभिनेता सनी देओलने आतापर्यंत गदर, यमला पगला दिवाना, अपने, घायल, घातक यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. सध्या सनी पल पल दिल के पास या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात सनीचा मुलगा करण देओल मुख्य भूमिकेत दिसणार असून स्वत: सनी देओल या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *