आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा?

मुंबई : लोकसभा निकालानंतर देशासह राज्यभरात राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असताना, आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 4 वाजता युवासेनेची शिवसेना भवनात बैठक होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे …

आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा?

मुंबई : लोकसभा निकालानंतर देशासह राज्यभरात राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असताना, आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 4 वाजता युवासेनेची शिवसेना भवनात बैठक होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्षासह, भाजपातील केंद्रीय पक्षश्रेठी त्याबाबत आग्रही आहेत.

दरम्यान, आज सायंकाळी 5 वाजता शिवसेना नेत्यांची बैठक होत आहे. उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्धव ठाकरेंचं निवासस्थान ‘मातोश्री’वर होणार आहे. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्तार, उपमुख्यमंत्री पदावर चर्चा होण्याची शक्यता आहे. जर शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळालं, तर आदित्य ठाकरे यांचं नाव त्या पदासाठी शिवसेनेकडून देण्यात येऊ शकतं. त्यामुळे आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आदित्य ठाकरेंची चर्चा

दरम्यान, आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा होती. मात्र त्यावेळी स्वत: उद्धव ठाकरे यांनी ती चर्चा फेटाळून लावली होती. “बाळासाहेबांनी माझ्यावर कोणतंही बंधन घातलेलं नव्हतं,मीही आदित्यवर कोणतंही बंधन घातलेलं नाही. निवडणूक लढवायची की नाही हा त्याचा निर्णय आहे. पण ही निवडणूक तरी तो लढवणार नाही हे निश्चित.” असं उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणाले होते.

VIDEO:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *