शिवसेनेचा ताबा पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार? सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयाने शिंदे गटाला झटका बसणार?; कायदेतज्ज्ञ काय म्हणतात?

राज्यातील सत्ता संघर्षावरील निर्णयात शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. राज्यातील शिंदे सरकार वाचलं आहे. पण शिंदे यांच्या हातून पक्ष जाण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा शिवसेनेचा ताबा येऊ शकतो, असं कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

शिवसेनेचा ताबा पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने शिंदे गटाला झटका बसणार?; कायदेतज्ज्ञ काय म्हणतात?
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 6:27 AM

नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निर्णयानुसार शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे. कोर्टाने शिंदे सरकार बेकायदेशीर ठरवलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. मात्र, शिवसेनेचा ताबा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचं प्रतोदपद बेकायदेशीर ठरवलं आहे. कोर्टाच्या या निकालामुळे शिवसेनेचा ताबा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी याबाबत सविस्तर विवेचन केलं आहे. शिवसेना कुणाची? याबाबतचा निर्णय येणे अजून बाकी आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाचा निर्णय पलटवूही शकते. कारण गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती करताना विधानसभा अध्यक्षांनी लेजिसलेटिव्ह पार्टीच्या बेसिसवर ही नियुक्ती केली. राजकीय पक्ष म्हणून निर्णय दिला नाही. तोच प्रकार शिवसेनेचा ताबा देताना झाला आहे. तुम्ही लेजिस्लेचर पार्टीच्या बेसिसवर निर्णय दिला. तुम्ही सर्व अॅफिडेव्हिट चेक करायला हवे होते, असं सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला म्हणू शकतं. सर्वोच्च न्यायालय आयोगाचा निकाल पलटवूही शकतं. पक्ष परत उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो. ती शक्यता आहे, असं सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

एक दोन महिन्यात निर्णय

पक्षाचा ताबा कुणाला द्यायचा हे मॅटर पेंडिंग आहे. फक्त आमदार, खासदारांची संख्या नाही तर सर्व चेक केलं पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं आहे. सुट्टीनंतर त्यावर निर्णय होईल. पक्ष पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो, असं सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं. पक्ष कुणाकडे राहणार त्यावर कोर्ट एक दोन महिन्यात निर्णय देणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळे…

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पदावर कायम राहणार आहेत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यामुळे शिंदे-फडणवीस राज्यपालांकडे गेले. राज्यात नवं सरकार आलं. त्यामुळे आता शिंदेच मुख्यमंत्री राहतील. उद्धव ठाकरे यांच्या चुकीमुळे त्यांना आजच्या निकालात रिझल्ट मिळाला नाही, असं शिंदे म्हणाले.

एक ते दीड वर्ष लागेल

नबाम रेबिया प्रकरणाचा कोर्टाने उल्लेख केला. नबाम रेबियाप्रकरणानुसार स्पीकरवर अविश्वास असला तर तो अपात्रतेचा निर्णय घेऊ शकत नाही. कोर्टाला या निर्णयात तफावत वाटते. त्यामुळे कोर्टाने हे प्रकरण लार्जर बेंचकडे पाठवलं आहे. त्यावर निर्णय यायला एक ते दीड वर्ष लागतील. या केसला त्याचा फायदा होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गोगावलेच प्रतोद

स्पीकरच्या भूमिकेवर कोर्टाने ताशेरे ओढले आहे. व्हीप हा राजकीय पक्षच देतो. विधिमंडळ पक्ष देत नाही. स्पीकरने गोगावलेंना अपाईंट केलं. ते चुकीचं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगानेच पक्ष शिंदे गटाला दिल्याने आता गोगावले प्रतोद आहेत. 16 आमदारांचं प्रकरणात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही. कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निर्णय घ्यायला सांगितलं आहे. रिझनेबल टाईममध्ये निर्णय घ्यायला सांगितलं आहे. म्हणजे सहा महिने, एक वर्ष किंवा दीड वर्ष तो कालावधी असू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.