आता कॉकरोच राजकारणात उतरणार का? लवकरच नवा पक्ष? अभिजीत दीपकेचा प्लान काय? 3 शक्यता

सध्या चर्चेत असणारी कॉकरोच जनता पार्टी हा पुढे काय पाऊल उचलण्याची शक्यता आहे? जाणून घ्या सविस्तर...

आता कॉकरोच राजकारणात उतरणार का? लवकरच नवा पक्ष? अभिजीत दीपकेचा प्लान काय? 3 शक्यता
CJP
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 30, 2026 | 4:56 PM

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने संपूर्ण देशात खळबळ माजली. ६ जून २०२६ रोजी सीजेपीचा संस्थापक अभिजीत दिपके पहिल्यांदा लंडनहून दिल्ली विमानतळावर उतरला आणि थेट जंतर-मंतर आंदोलन स्थळावर पोहोचले. २० जूनला पुन्हा आंदोलनाला बसला. मग ३६ दिवसांनंतर २५ जुलैला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन उठले. जंतर-मंतरहून जाताना कॉकरोच पार्टीने आंदोलकांना सांगितले- ‘लवकरच पुन्हा भेटू’ याचे संकेत काय आहेत? कॉकरोच जनता पार्टीच्या सुरुवातीला संस्थापक अभिजीत दिपके म्हणाले होते की, राजकारणात उतरण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. ते कोणत्याही राजकीय पक्षाबरोबरही येणार नाहीत. मात्र जंतर-मंतरवरील ३६ दिवसांच्या आंदोलनानंतर २५ जुलैला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अनेक संकेत मिळाले की, कॉकरोच पार्टी राजकारणात उतरू शकते. १४ जुलैला सीजेपीच्या एक्स टीम सदस्य विजेता दहिया म्हणाले होते, राजकारण ही काही वाईट गोष्ट नाही, लोकांनी यात यायला हवे. मात्र सध्या आम्हाला वाटते की, आंदोलनासारख्या गोष्टी करुन पुढे जाण्याची गरज आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us