Shivsena : ‘मिशन लोकसभा’ भाजपपाठोपाठ शिवसेनाही मैदानात, उत्तरप्रदेशात 30 जिल्हाध्यक्षांची निवड

शिवसेना पक्षप्रमुखांनी आता पक्ष संघटनेवर भर दिला आहे. महाराष्ट्रात हे काम तर सुरु आहेच, पण आता उत्तर प्रदेशातही त्यांनी या कामाला सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. तर आगामी काळात पक्ष प्रमुख तसेच शिवसेनेतील बडे नेते उत्तरप्रदेशात असणार आहेत.

Shivsena : 'मिशन लोकसभा' भाजपपाठोपाठ शिवसेनाही मैदानात, उत्तरप्रदेशात 30 जिल्हाध्यक्षांची निवड
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 3:51 PM

मुंबई :  (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली होती. अडीच महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांना थोपवण्यात (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही पक्ष मजबूतीकरणावर भर दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने भाजपाने तयारी सुरु केली असली तरी शिवसेनाही मागे राहिलेली नाही. (Uttar-Pradesh) उत्तर प्रदेशात संघटना मजबूत करण्यासाठी 30 जिल्ह्यांमध्ये जिल्हाप्रमुखांची नव्याने घोषणा करण्यात आली आहे.

भाजपाचे वर्चस्व तरीही शिवसेनेचा लढा

उत्तर प्रदेशामध्ये भाजपाचे वर्चस्व आहे. असे असताना ज्या पद्धतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत येऊन पक्ष संघटनेवर भर देण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने आता शिवसेना देखील पावले उचलत आहे. आता तडजोडीचे राजकारण नाही असे म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने 30 जिल्ह्यांमध्ये जिल्हाप्रमुखांची निवड केली आहे.

पक्ष मजबूतीकणासाठी नेमकी रणनीती काय?

शिवसेना पक्षप्रमुखांनी आता पक्ष संघटनेवर भर दिला आहे. महाराष्ट्रात हे काम तर सुरु आहेच, पण आता उत्तर प्रदेशातही त्यांनी या कामाला सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. तर आगामी काळात पक्ष प्रमुख तसेच शिवसेनेतील बडे नेते उत्तरप्रदेशात असणार आहेत. केवळ लोकसभा निवडणूकच नव्हे तर महापालिका निवडणूकांमध्येही शिवसेनेचा उमेदवार राहणार असल्याचे अनिस सिंह यांनी सांगितले आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या

उत्तर प्रदेशातील 30 जिल्ह्यांमध्ये अनिल सिंह यांनी जिल्हाप्रमुखांची घोषणा केली आहे. त्यामध्ये मुझफ्फरनगर, फरुखाबाद, नोएडा, बुलंदशहर, कासगंज, फिरोजाबाद, अमरोहा, बरेली, पिलीभीत, मिर्झापूर, आंबेडकर नगर, लखीमपूर खेरी, मुरादाबाद, मेरठ, गाझियाबाद, सीतापूर, गोंडा, कन्नौज, बहराईच, बस्ती, चंदौली, प्रतापगढ, बाराबंकी, फतेहपूर, कौशांबी, बांदा, चित्रकूट, सोनभद्र, प्रयागराज आणि आग्रा यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.