Agnipath Scheme : ‘अग्निपथ’ योजनेवरुन दीपाली सय्यद यांचा थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा; हाफ चड्डीवीर म्हणत मोदींच्या धोरणावर टीका

अग्निपथ योजनेला महाराष्ट्रातूनही विरोध पाहायला मिळतोय. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली जातेय. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी या योजनेवरुन आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलाय.

Agnipath Scheme : 'अग्निपथ' योजनेवरुन दीपाली सय्यद यांचा थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा; हाफ चड्डीवीर म्हणत मोदींच्या धोरणावर टीका
दीपाली सय्यद यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदींवर टीकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 3:43 PM

मुंबई : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरुन (Agnipath Scheme) देशभातील चार राज्यात मोठी नाराजी पाहायला मिळतेय. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थाननंतर आता तेलंगणात हिंसक आंदोलन सुरु आहे. रेल्वे स्टेशन फोडण्यात आले, रेल्वे गाड्याही जाळण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनंही अग्निपथ योजनेतील वयोमर्यादेत काही बदल केले आहेत. दरम्यान, अग्निपथ योजनेला महाराष्ट्रातूनही (Maharashtra) विरोध पाहायला मिळतोय. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली जातेय. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी या योजनेवरुन आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलाय.

दीपाली सय्यद यांचा संघ, मोदींवर निशाणा

दीपाली सय्यद यांनी ट्विटरवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदींवर टीका केलीय. ‘2024 च्या निवडणुकीत अगोदर संघाच्या हाफ चड्डीवीरांना किमान कंत्राट बेसिसवर तरी कामाला लावणे गरजेचे आहे. नाहीतर याचे पडसाद निवडणुकीला दिसतील याची भीती भाजपला आहे. अग्निपथ कितीही देशाच्या सुरक्षेच्या हेतुने विरोध जरी झाले, नुकसान झाले तरी निवडणूक महत्वाची हे मोदींजींचे धोरण चुकीचे आहे’, अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी मोदी आणि संघावर टीका केली.

मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान – राष्ट्रवादी

पंतप्रधान मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान आहेत अशी जनतेची धारणा होऊ लागली आहे. अनेक मोठ्या योजना आणि धोरणे आणण्याचा उत्साह केंद्र सरकार दाखवत असले तरी प्रत्यक्षात ठोस कृतिशील आखणी नसल्याने अनेकदा या योजनांमध्ये बदल करावे लागले तर अनेक योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलीय.

मोदी सरकार युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करतेय का?

मोदी सरकार सत्तेत येऊन आठ वर्ष झाली आहेत. या आठ वर्षात मोदी सरकारने आणलेल्या सर्व मोठ्या योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत. CAA, कृषी कायदे आणि आता अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभर हिंसक आंदोलने होत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर चालले. 700 हून अधिक शेतकरी यामध्ये मृत्यूमुखी पडले. आता अग्निपथ योजना लादून मोदी सरकार युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे का? जनतेचा रोष असाच वाढत राहिल्यास ज्याप्रमाणे या देशाने मोदींची एकही मोठी योजना स्वीकारली नाही, त्याप्रमाणे आता 2024 ला देशाची जनता मोदींना देखील स्वीकारणार नाही, असा दावाही राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.