सोशल मीडियावरील वावड्यांकडे लक्ष देऊ नका : संग्राम जगताप

| Updated on: Jul 17, 2019 | 4:26 PM

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा, सोशल मीडियावर रंगली आहे.

सोशल मीडियावरील वावड्यांकडे लक्ष देऊ नका : संग्राम जगताप
Follow us on

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा, सोशल मीडियावर रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. “सोशल मीडियावरील चर्चा या वावड्या असून त्याकडे लक्ष देऊ नका”, असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय.

संग्राम जगताप म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबतच्या वावड्या सुरु आहेत. या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार असं काही दिवसांनी सुरुच असतं. सोशल मीडियावर या चर्चा सुरु असतात. मात्र अशा बातम्यांबाबत सोशल मीडियावर विश्वास ठेवायचा का हा ज्याचा त्याचा भाग आहे. अशा बातम्यांना थारा देऊ नका. मी एखाद्या पक्षात जाणार ही बातमी खरी नाही, त्या बातम्यांना महत्व देऊ नका”

मी राष्ट्रवादीचा आमदार आहे. काही दिवसापूर्वी मी राष्ट्रवादीकडूनच लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी शरद पवारांनी माझ्यासाठी अनेक सभा घेतल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणं शक्य नाही, असं संग्राम जगताप यांनी सांगितलं.

नगरमध्ये राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत, त्या सर्वांबाबत अशा चर्चा केल्या जातात. मात्र त्यात काहीही तथ्य नाही. या चर्चा त्यांच्याच पक्षाचे लोक सुरु करतात. चर्चा स्वत: सुरु करुन महत्त्व वाढवून घ्यायचं असं यांचं काम आहे, असंही संग्राम जगताप म्हणाले.

सोशल मीडियावर अशा चर्चा करणाऱ्यांना वेळ भरपूर असतो, त्यामुळे ते अशा चर्चा करत राहतात असा टोमणा त्यांनी लगावला.

संग्राम जगताप वि सुजय विखे पाटील

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप विरुद्ध भाजपचे सुजय विखे पाटील यांच्यात लढत झाली. अटीतटीच्या या लढतीत सुजय विखे पाटील यांनी बाजी मारली.

संबंधित बातम्या 

नगर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा : संग्राम जगताप

शिवसेनेने कायम मला गोवण्याचा प्रयत्न केला, यांनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली : संग्राम जगताप   

सुजयला पाडणं माझं कर्तव्य, विखेंचा सख्खा भाऊ संग्राम जगतापांच्या मदतीला   

नातं मध्ये येणार नाही, कोणत्याही परिस्थितीत सुजयचाच विजय : शिवाजी कर्डिले