AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: चंद्रकांत पाटलांनी साधी ‘टरबूज खरबूज’ सोसायटीही चालवलेली नाही; मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस: अजित पवार

अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. | Ajit Pawar Chandrakant Patil

VIDEO: चंद्रकांत पाटलांनी साधी 'टरबूज खरबूज' सोसायटीही चालवलेली नाही; मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस: अजित पवार
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार
| Updated on: Apr 15, 2021 | 12:26 PM
Share

पंढरपूर: चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांना ग्रामीण भागाशी काहीही देणघेणं नाही. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे. त्यांना कोणतीही संस्था किंवा साधी सोसायटी चालवण्याचाही अनुभव नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. (NCP leader Ajit Pawar slams BJP Chandrakant Patil)

ते बुधवारी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या शिवाजी चौकातील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चंद्रकांत पाटील यांनी कधी कुठलीही संस्था काढलेली नाही, कुठलीही बँक किंवा कारखाना चालवलेला नाही, कुठलीही विकास सोसायटी किंवा मजूर सोसायटी चालवलेली नाही. टरबूज-खरबुज सोसायटी कधी काढली नाही. त्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांशी काहीही देणघेणं नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाचा झंझावात आल्यामुळे त्यांना लॉटरी लागलेली आहे. ही गोष्ट पंढरपूरच्या मतदारांनी समजून घ्यावी. शेतकरी आणि गोरगरीबांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भगीरथ भालके यांना प्रचंड मताधिकाऱ्याने विधानसभेवर निवडून पाठवा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

अजित पवारांकडून पुन्हा ‘चंपा’चा उल्लेख

या प्रचारसभेत अजित पवार यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’ या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचले. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. हे कुणी जरी आले, तरी तुम्ही त्यांचं काहीही ऐकू नका. ते टिकाटिप्पणी करतील. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी पंढरपूरच्या मतदारांना केले.

‘महाविकासआघाडीचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय’

या प्रचारसभेत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. राज्यातील सरकार कधी बदलायचं, ते माझ्यावर सोडा, असे फडणवीस यांनी पंढरपूरच्या सभेत म्हटले होते. त्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. राजकारणात कोणीही मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकासआघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीचे नेते बाजार बुणगे, आघाडी सरकार पांढऱ्या पायाचे, बलात्कारी; पडळकर, दरेकर बरसले

Maharashtra Lockdown | राज्यात संचारबंदी, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी नियम काय?

अजित पवारांनी राज्यातील 13 साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले; गोपीचंद पडळकरांचा घणाघाती आरोप

(NCP leader Ajit Pawar slams BJP Chandrakant Patil)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.