Ajit Pawar : शिंदे-फडणवीसांना कॅबिनेटच्या बैठकीत एकटक बघणाऱ्या 45 रिकाम्या खुर्च्यांचं टेन्शन; अजितदादांनी उडवली खिल्ली

Ajit Pawar : भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. याबाबत राज्यसरकार काय पाऊले उचलणार आहे हे सांगायला तयार नाही. निर्मला सीतारामण या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांचे स्टेटमेंट वाचले मात्र सर्वसामान्य गृहिणीला विचारले तर किती महागाई वाढली आहे हे लक्षात येईल.

Ajit Pawar : शिंदे-फडणवीसांना कॅबिनेटच्या बैठकीत एकटक बघणाऱ्या 45 रिकाम्या खुर्च्यांचं टेन्शन; अजितदादांनी उडवली खिल्ली
शिंदे-फडणवीसांना कॅबिनेटच्या बैठकीत एकटक बघणाऱ्या 45 रिकाम्या खुर्च्यांचं टेन्शन; अजितदादांनी उडवली खिल्लीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 3:34 PM

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची खिल्ली उडवली आहे. 33 दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार न केल्याने अजितदादांनी या दोन्ही नेत्यांची भर पत्रकार परिषदेत खिल्ली उडवली आहे. मी फडणवीसांचं स्टेटमेंट ऐकलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी त्यांच्या मोठ्या बैठकीत त्यांनी चर्चा केली. आढावा घेतला. तुम्ही विचार करा. त्या कॅबिनेटमध्ये 45 खुर्च्या असतात. बाकीच्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात, ते काय करतात हे पाहत असतात. त्यामुळे त्यांच्यावर रिकाम्या खुर्च्यांचं टेन्शन असतं. आपण दोघांनी काही चुकीचं करू नये बरं. काही चुकीचं करू नये बरं, असं ते या रिकाम्या खुर्च्यांना पाहून म्हणत असतात, अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली.

अजित पवार यांनी विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. उद्या कॅबिनेटची बैठक आहे ती ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची कॅबिनेट बैठक आहे, असा खोचक टोलाही अजित पवार यांनी यावेळी ‘दोघांच्या’ सरकारला लगावला. कुणी कितीही काही म्हटले तरी जनतेच्या मनात जे आहे तेच घडणार आहे, असेही अजित पवार यांनी जेपी नड्डा यांच्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितलं.

हे सुद्धा वाचा

विकास कामांना दिलेली स्थगिती उठवा

राज्यातील विकासकामांना स्थगिती दिल्याने जनतेमध्ये या सरकारबद्दल चीड निर्माण झाली आहे. ती कामे काही आमची वैयक्तिक नव्हती. राज्याच्या हिताचीच कामे होती. केवळ सरकार बदललं म्हणून कामांना स्थगिती देणं योग्य नाही. त्यामुळे विकासकामांना दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी, अशीही मागणी त्यांनी केली.

भाजीपाला महागला, सरकार काय करणार?

भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. याबाबत राज्यसरकार काय पाऊले उचलणार आहे हे सांगायला तयार नाही. निर्मला सीतारामण या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांचे स्टेटमेंट वाचले मात्र सर्वसामान्य गृहिणीला विचारले तर किती महागाई वाढली आहे हे लक्षात येईल. तेलाच्या किमती कमी आहेत हे मान्य करायला हवे परंतु इतर वस्तूंच्या किंमती कमी झालेल्या नाहीत. 2016 मध्ये नोटबंदी झाली त्यावेळी कॅशलेसचा आभास निर्माण केला गेला व काळा पैसा बाहेर येईल असे सांगण्यात आले. परंतु तसे झाले नाही. अद्याप आरबीआयने किती नकली नोटा मिळाल्या हे सांगितलेले नाही. दोन हजारच्या नोटा ब्ंद करण्यात आल्या आहेत अशी चर्चा आहे. ते शोधण्याचे काम केंद्रीय यंत्रणांनी करावे, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.