‘मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही, मग पाडलं काय म्हणता’, अजितदादांचा शिवतारेंना खोचक टोला

| Updated on: Oct 08, 2021 | 5:58 PM

आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. तसंच शिवसेनेचे माजी खासदार विजय शिवतारे यांना जोरदार टोला लगावला.

मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही, मग पाडलं काय म्हणता, अजितदादांचा शिवतारेंना खोचक टोला
अजित पवार, विजय शिवतारे
Follow us on

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना नियमांबाबत महत्वाची माहिती देतानाच, आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. तसंच शिवसेनेचे माजी खासदार विजय शिवतारे यांना जोरदार टोला लगावला. (Ajit Pawar’s criticism on Vijay Shivtare on the backdrop of elections)

विजय शिवतारेंना जोरदार टोला

मागील लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी शिवतारेंबाबत केलेल्या वक्तव्याची आठवण एका पत्रकाराने करुन दिली. त्यावेळी ‘तुम्हालाही माहिती आहे ना बाबा… मीच सांगितलं होतं की पुढच्यावेळी कसा निवडून येतो तेच बघतो. अन चॅलेंज काय, मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही आणि काय पाडलं म्हणता’, असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला.

महापालिकेसाठी संभाव्य आघाडीबाबत अजितदादा काय म्हणाले?

आमच्या तीन पक्षाच्या विरोधातील पक्ष आज पुणे महापालिकेत सत्तेत आहे. त्यांना सत्तेवरुन दूर ढकलण्यासाठी आम्ही तीन पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करु. त्याबाबत राज्य पातळीवर उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राज्याचे नेते, आम्ही सर्व मिळून चर्चा करु. जिल्हा पातळीवर 1992, 1997, 2002, 2007, 2012, 2017 येवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवलेला मी कार्यकर्ता आहे. आम्ही जिल्हा पातळीवर सांगतो की जिल्ह्याती तिथली परिस्थिती काय ती बघा आणि निर्णय घ्या. आताही तशाच प्रकारचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीला देशपातळीवरील तीनही पक्षाचे नेते निर्णय घेतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य असेल, असंही अजित पवार म्हणाले. त्यावेळी शिवसेनेचे माजी खासदार विजय शिवतारे हे लोकसभेला आघाडीसाठी अनुकूल नाहीत, असं पत्रकारांनी विचारलं. त्यावर पुन्हा एकदा अजित पवार यांनी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेत ते जे ठरवतील तेच होणार, असं स्पष्ट केलं.

पुणे, पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासा

अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिलीय. सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय.

कोणकोणते महत्वाचे निर्णय?

सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 पर्यंत सुरु राहणार
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पर्यटन स्थळे सुरु करणार
महाविद्यालये लवकरच सुरु करण्याचा विचार
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी पर्यत्न
मिशन कवच अभियान उत्स्फुर्तपणे राबवणार
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालये सोमवारपासून सुरु होणार, विद्यार्थ्याांचं लसीकरण बंधनकारक

इतर बातम्या :

अजित पवार खोटं बोलतात, जरंडेश्वर सारख कारखाना व्यवहारावरुन शालिनी पाटलांचा घणाघात

अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन, छापेमारीचा तीव्र निषेध

Ajit Pawar’s criticism on Vijay Shivtare on the backdrop of elections